राजकीयअखेर निलेश सांबरे यांनी शिवसेनेत केला जाहीर प्रवेश….

अखेर निलेश सांबरे यांनी शिवसेनेत केला जाहीर प्रवेश….

जिजाऊ संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष निलेश सांबरे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
या ऐतिहासिक क्षणी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेचं निशाण हाती घेतलं आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आपला विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला.या प्रसंगी उद्योग मंत्री तथा शिवसेनेचे नेते उदय सामंत व ईतर मान्यवय उपस्थित होते.‌
निलेश सांबरे हे सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर आहेत, गोर गरीबांसाठी मोफत शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे आहे
या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद अधिक बळकट झाली असून, शिंदे साहेबांचे नेतृत्व अधिक प्रभावी व व्यापक झाले आहे.
शिवसेना पक्षाचा विस्तार आणि लोकसंपर्क अधिक बळकट होतोय, हे परिवर्तनाचं प्रतीक आहे.काही दिवसांपूर्वीच निलेश सांबरे यांनी रत्नागिरी येथे मोफत रुग्णालय सुरू केले आहे.

Breaking News

सावर्डे विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा उत्साहात प्रारंभ

सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक...

अली पब्लिक स्कूल सावर्डे येथील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परीक्षेत उज्वल यश

सावर्डे -राज्य शासनातर्फे आयोजित राज्यस्तरीय एलिमेंटरी व इंटरमिजिट चित्रकला...