अल्प कालावधीतच अफाट लोकप्रियता मिळवलेले राजापूर-लांजा- साखरपा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यतत्पर आमदार श्री. किरण उर्फ भैया सामंत यांच्या उपस्थितीत मुंबई व उपनगरातील शिवसेना कार्यकर्त्यांचा विशेष ऊर्जा देणारा स्नेहमेळावा संपन्न..
राजापूर-लांजा- साखरपा मतदार संघातील मुंबई तसेच उपनगरस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा लोकप्रिय आमदार श्री. किरण उर्फ भैया सामंत साहेब यांच्या विशेष उपस्थितीत रविवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी परेलच्या राष्ट्रीय मजदूर मिलच्या भव्य सभागृहात संपन्न झाला. विधानसभेतील भरघोस विजयानंतरचा मुंबईतील हा पहिलाच कार्यकर्ता मेळावा होता. सकाळपासून मुसळधार पावसाची संततधार असूनही आपल्या लाडक्या नेत्यावर प्रेम करणाऱ्या समस्त शिवसैनिकांनी या मेळाव्याला हमखास हजेरी लावत सभागृह तुडुंब केले.
यावेळी अनेकांनी आपले विचार मांडले, दरम्यान आमदार साहेबांच्या गावभेट कार्यक्रमाचं सर्वांनीच विशेष कौतुक केले. आमदार साहेबांनी आपल्या भाषणात अभ्यासपूर्ण माहिती देत आजवर झालेल्या एकूणएक कामाची इत्यंभूत माहिती दिली. तसेच भविष्यात विचाराधीन असलेले लोकाभिमुख आराखडे याठिकाणी मांडले. पाणीपुरवठा हा महत्वाचा मुद्दा पूर्णत्वास नेला जात असतानाच त्यासोबतीने रस्ते, शिक्षण, रोजगार, इत्यादी मुद्यांवर विशेष लक्ष देऊन जोरदार काम सुरू असल्याचे नमूद केले. उपस्थित गर्दीला एक आपल्या हक्काचा आणि ताबडतोब निर्णय घेण्याची क्षमता असलेला नेता मिळल्याची सुखद भावना मिळाली. येणाऱ्या काळातदेखील असेच अनेक सुखद अनुभव येणार असल्याची चिन्हे यावेळी अधोरेखित झाली. यावेळी व्यासपीठावर माजी महापौर नवीमुंबई महानगरपालिका श्री. अविनाश लाड साहेब, जगदीश राजपकर साहेब, जया माने साहेब, राजू कुरुप साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्यासाठी मतदारसंघाचे मुंबई संपर्कप्रमुख श्री. विश्वास राघव साहेब यांच्या नेतृत्वाखाली तालुका संपर्कप्रमुख श्री. आत्माराम चाचे साहेब, भास्कर चव्हाण साहेब, मारुती नेमण साहेब यांच्यासह समस्त कार्यकारिणी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेऊन हा सोहळा यशस्वी केला.
अल्प कालावधीतच अफाट लोकप्रियता मिळवलेले राजापूर-लांजा- साखरपा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यतत्पर आमदार श्री. किरण उर्फ भैया सामंत यांच्या उपस्थितीत मुंबई व उपनगरातील शिवसेना कार्यकर्त्यांचा विशेष ऊर्जा देणारा स्नेहमेळावा संपन्न..
