रत्नागिरीअसुर्डे विद्यालयातील संस्कार शिबिराची सांगता

असुर्डे विद्यालयातील संस्कार शिबिराची सांगता

वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, असुर्डे -आंबतखोल या विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या संस्कार शिबिराची सांगता झाली. या शिबिराच्या शेवटच्या दिवशी व्याख्यान, मनोरंजनात्मक खेळ, क्यूब, कागदकाम, पालकांचे, गुरुजनांचे औक्षण,कृतज्ञता सोहळा, पालक मनोगत, विद्यार्थी मनोगत, अनुभव कथन, शिबिरातील विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र वितरण इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले.या कार्यक्रमासाठी शालेय समितीचे जेष्ठ सदस्य शंकर खापरे,पालक – शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री .तुकाराम शेडेकर,ज्योती खुनम, माजी सरपंच आंबतखोल,रणजित खुनम,उज्वला चोगले,सौ.साळुंखे,सौ.दळवी यासारखे मान्यवर पालक, प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमवेळी शंकर खापरे यांनी विद्यालयाने संस्कार शिबिर आयोजित केले त्याबद्दल मुख्याध्यापक अमर भाट व विद्यालयाचे हार्दिक अभिनंदन केले. असुर्डे आंबतखोल विद्यालयाने हे मोफत संस्कार शिबिर आयोजित करून एक आदर्श निर्माण केला आहे. संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी एक चांगला, कौतुकास्पद प्रयत्न केला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या म्हणजेच भावी पिढीच्या अंगी संस्कार रुजवणे ही सुद्धा काळाची गरज बनलेली आहे.

विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर भाट यांनी याप्रसंगी उपस्थित पालक, ग्रामस्थ,शिबिरामध्ये सहभागी असणारे विद्यार्थी,शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले. फक्त बौद्धिक गुणवत्ता वाढविणे म्हणजे सर्वांगीण विकास नव्हे तर कला, क्रीडा, ज्ञान, विज्ञान, सुसंस्कार यामध्ये सक्षमता आणणे म्हणजे सर्वांगीण विकास.आपल्या भारताला लाभलेली संस्काराची परंपरा जोपासणे,तिचे संवर्धन करणे व पुढच्या पिढीला दिशा दाखवणे हा या संस्कार शिबिराचा प्रमुख हेतू होता असे यावेळी त्यांनी सांगितले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी असुर्डे, आंबतखोल पंचक्रोशीतील सर्व घटकांचे सहकार्य लाभले याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक यु आर पाटील यांनी केले तर अमित राऊत यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Breaking News

झाडे लावण्यापेक्षा लावलेली झाडे जगविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी – आमदार किरण सामंत

🔴झाडे लावण्यापेक्षा लावलेली झाडे जगविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी...

सिकंदराबाद येथे माजी सैनिक आणि सेवारत सैनिकांच्या पाल्यांसाठी ‘अग्निवीर’ भरती मेळावा

सिकंदराबाद येथे माजी सैनिक आणि सेवारत सैनिकांच्या पाल्यांसाठी 'अग्निवीर'...