रत्नागिरीअसुर्डे विद्यालयात पालक-शिक्षक सभा

असुर्डे विद्यालयात पालक-शिक्षक सभा

सह्याद्रि शिक्षण संस्थेचे वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, असुर्डे -आंबतखोल या विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025- 26 ची पालक शिक्षक सभा संपन्न झाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर भाट यांच्या मार्गदर्शनानुसार या सभेचे आयोजन करण्यात आले होते.विविध शासकीय योजना व शिष्यवृत्ती, शालेय व बाह्य परीक्षा, पोषण आहार, शालेय सहशालेय उपक्रम,पावसाळी क्रीडा स्पर्धा,वर्षासहल, विद्यालयातील भौतिक सुविधा, इयत्ता दहावी, इयत्ता पाचवी व आठवी स्कॉलरशिप आणि एन एम एम एस परीक्षांच्या तयारीसाठी जादा तास, इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया या विविध विषयावर सदर सभेदरम्यान सविस्तर चर्चा करण्यात आली.

चालू शैक्षणिक वर्षासाठी पालक- शिक्षक संघ,माता पालक संघ यांची स्थापना करण्यात आली.तसेच सखी सावित्री समिती,महिला तक्रार निवारण समिती /अंतर्गत तक्रार समिती,विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती यासारख्या शासन निर्देशीत विविध समित्यांचे पुनर्गठन करण्यात आले.

यावेळी बोलताना विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक भानुदास देसाई यांनी विद्यालयातील विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रशालेचे चालू असलेले प्रयत्न, जादा मार्गदर्शन,ई लर्निंग सुविधा,भविष्यातील नियोजन व उपक्रम,विद्यालयातील भौतिक सुविधांची निर्मिती याविषयी उपस्थितांना माहिती दिली.तसेच गेल्या तीन वर्षांपासून विद्यालयाने ‘एकच ध्यास, गुणवत्ता विकास ‘हे घोष वाक्य घेऊन विदयार्थ्यांचा शैक्षणिक व सांस्कृतिक विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे,असे सांगितले.

यावेळी बोलताना पालक प्रतिनिधी सुनील शिगवण, संजय शिगवण यांनी विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीचे कौतुक केले व विदयार्थ्यांच्या काही समस्या मांडल्या.या कार्यक्रमासाठी सुनील शिगवण, दीप्ती शिर्के, तुकाराम शेडेकर इ. मान्यवर, इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे पालक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यु आर पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रीतम विचारे यांनी सर्वांचे आभार मानले.

Breaking News

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पा मध्ये पालकमंत्री डॉ.उदय सामंतांची बल्ले बल्ले

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पा मध्ये पालकमंत्री डॉ.उदय सामंतांची बल्ले बल्ले.....

जिष्णू देव वर्मा बनले महाराष्ट्राचे नवे राज्यपाल.

👉केंद्र सरकारने देशातील 9 राज्यांच्या राज्यपाल आणि काही...