रत्नागिरीआंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रेच्या नियोजनाचा आढावा

आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रेच्या नियोजनाचा आढावा

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवीचा जत्रोत्सव 22 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. शासन, प्रशासन आणि आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी त्यांच्या वतीने जत्रेचे नियोजन करण्यात आले आहे या यात्रा पूर्व नियोजनाचा आढावा पालकमंत्री नितेश राणे यांनी आंगणेवाडी येथे  गुरुवारी घेतला. आंगणेवाडी मध्ये येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा आणि सुरक्षितता या गोष्टी महत्त्वाच्या असून भाविकांची कुठेही गैरसोय होता नये याच्यासाठी प्रशासना च्या प्रत्येक विभागाने खबरदारी घ्यावी. केलेल्या नियोजना प्रमाणे सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय साधावा. यात्रेमध्ये कुठेही अप्रिय घटना घडू नये याच्यासाठी स्थानिक मंडळ आणि प्रशासन यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पुढील वर्षी आंगणेवाडी मध्ये पाणी, वीज, मोबाईल नेटवर्क, ड्रेनेज यंत्रणा, स्वच्छतागृह व्यवस्था या गोष्टी कायमस्वरूपी दूर केलेल्या असतील असे यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. पोलीस प्रशासनाने पीक पॉकेटर जुगार तसेच इतर अवैद्य धंदेवाईक यांच्यावर कडक कारवाई करावी असे आदेश सुद्धा त्यांनी दिले. वीज वितरण कंपनीने सुद्धा वीज पुरवठा खंडित होणार नाही याच्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आत्ताच कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले. मनोरंजन खेळणी असलेल्या ठिकाणाची सर्व साहित्याची तपासणी करावी. कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी काळजी घ्यावी अशा सूचना त्यानि बांधकाम विभागाला दिल्या. तसेच यावेळी आरोग्य, पोलीस प्रशासन, पाणीपुरवठा विभाग यांना सुद्धा आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे, बाबू आंगणे, आनंद आंगणे, बाळा आंगणे, मधुकर आंगणे, भास्कर आंगणे, अनंत आंगणे तसेच विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Breaking News