रत्नागिरी तालुक्यातील शिरगांव येथील आडी मराठी शाळेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते फित कापून व कोनशीलेचे अनावरण करून पार पडले.
ही नवी इमारत फक्त विटा-मातीची नसून, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची, आशांची आणि उज्ज्वल भविष्यातील पहिली पायरी आहे असे म्हणत, विद्यार्थ्यांना शिक्षण देताना त्यांच्या आवडी-निवडी ओळखून, नाविन्यपूर्ण पद्धतीने ज्ञान देण्याचे महत्त्व ना. उदय सामंत ह्यांनी अधोरेखित केले. या शाळेतून भविष्यात वैज्ञानिक, IAS अधिकारी आणि समाजाला दिशा देणारे मान्यवर घडावेत, अशी अपेक्षा ना. उदय सामंत ह्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, प्रांताधिकारी श्री. जीवन देसाई, तालुका प्रमुख श्री. बाबू म्हाप, श्री. बंड्या साळवी शिरगांव सरपंच फरीदा काझी ग्रामस्थ जयंतराव करमरकर आदी मान्यवर तसेच शाळेचे आजी-माजी विद्यार्थी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
