रत्नागिरीआमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी विरोधकांचा सुपडा साफ करीत सर्व च्या...

आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी विरोधकांचा सुपडा साफ करीत सर्व च्या सर्व जागा जिंकून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत राजापूर लांजा भागात घडवला नवीन इतिहास

आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी विरोधकांचा सुपडा साफ करीत सर्व च्या सर्व जागा जिंकून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत राजापूर लांजा भागात घडवला नवीन इतिहास

👉 शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने लांजा राजापूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या एक हाती सत्तेचे आमदार किरण सामंत यांनी दिले मोठे गिफ्ट–
👉*आमदार किरण उर्फ भैय्या सामंत म्हणाले *लांजा– राजापूरच्या विजयाचा शिलेदार मी नसून माझे कार्यकर्ते व पदाधिकारी”*

लांजा–राजापूरमधील ऐतिहासिक विजयावर आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केल्या भावना

🛑लांजा राजापूर वासियानी कधी न पाहिलेला विजयाचे आज सर्वच साक्षीदार

🛑महायुतीच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे आमदार किरण सामंतांनी मानले आभार

🛑राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि सर्व मित्र पक्षाचे मानले आभार..!

लांजा–राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयावर आमदार किरण सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त करत हा विजय संपूर्णपणे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा असल्याचे स्पष्ट केले. “या विजयाचे शिलेदार मी नसून, अहोरात्र मेहनत करणारे माझे निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनतेचा विश्वास हेच खरे शिलेदार आहेत,”असे आमदार किरण सामंत यांनी सांगितले.
निवडणूक काळात प्रत्येक गावात, वाड्या-वस्त्यांवर पोहोचून जनतेशी संवाद साधत कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आणि संघटनशक्तीमुळेच हा दणदणीत विजय शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. जनतेने दिलेला कौल हा विकासकामांची पावती असून, हा विश्वास अधिक जबाबदारीने जपण्याचे आवाहनही त्यांनी केले.
“लांजा–राजापूरचा हा विजय ऐतिहासिक असून, येत्या काळात तालुक्याचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा आणि लोकाभिमुख कामांना अधिक गती दिली जाईल,” असे आश्वासन देत आमदार किरण सामंत यांनी सर्व मतदार, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले.
या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, लांजा–राजापूर तालुक्यात शिवसेना महायुतीची ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे-.

“लांजा–राजापूरवासीयांनी कधी न पाहिलेला विजय; आज सर्वच त्याचे साक्षीदार”
महायुतीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आमदार किरण सामंत यांनी मानले जाहीर आभार
लांजा–राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला मिळालेला दणदणीत आणि ऐतिहासिक विजय हा तालुक्याच्या राजकीय इतिहासात कधी न पाहिलेला असल्याचे आमदार किरण सामंत यांनी स्पष्ट केले. “लांजा–राजापूरवासीयांनी यापूर्वी कधीही न अनुभवलेला असा हा विजय असून, आज या यशाचे सर्वच साक्षीदार आहेत,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या अभूतपूर्व यशाबद्दल आमदार किरण सामंत यांनी महायुतीच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले. प्रचार काळात प्रत्येक गावात, वाड्या-वस्त्यांमध्ये जाऊन केलेली मेहनत, संघटनातील शिस्त आणि जनतेशी प्रामाणिक संवाद यामुळेच हा मोठा विजय शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
“हा विजय म्हणजे जनतेने विकासावर, विश्वासावर आणि एकसंघ नेतृत्वावर टाकलेली शिक्कामोर्तब आहे. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,” असे आश्वासन देत आमदार किरण सामंत यांनी पुढील काळात लांजा–राजापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या विजयामुळे लांजा–राजापूर तालुक्यात महायुतीची ताकद अधिक भक्कम झाली असून, राजकीय वर्तुळात या निकालाची जोरदार चर्चा होत आहे….

Breaking News

जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी

रत्नागिरी,  :- जिल्हा नियोजन समितीची बैठक उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे...