राजापूरआमदार किरण सामंत यांचा गावभेट दौरा म्हणजे जणू आमसभाच…..

आमदार किरण सामंत यांचा गावभेट दौरा म्हणजे जणू आमसभाच…..

🌟आमसभेतील प्रश्न सुटत आहेत आमदारांच्या ग्राम सभेतच

👉नागरिकांचे प्रश्न मार्गी लागत आहेत थेट अधिकाऱ्यांसमोर गावातच

🖋️भरत माने/पत्रकार

…..यापूर्वी तालुक्याच्या आमसभा आपण पाहिलेल्या आहेत. कधी कधी त्या होतच नाहीत हा प्रश्न वेगळाच. तालुक्याच्या ठिकाणी आमसभा भरते त्या ठिकाणी आमदार असतात, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी असतात. हजारो लोक जमतात काही तासात हजारो प्रश्न उपस्थित होतात त्यात प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न होतात. काही सफल होतात काही असफल. मात्र आपण सध्या लांजा राजापूर साखरपा मतदारसंघात आमदार किरण भैया सामंत यांचा झंजावती गावभेट दौरा पाहत आहोत. प्रत्येक गावामध्ये जाऊन भैया बैठक घेत आहेत

. त्यांच्या समवेत प्रत्येक विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत आहेत. यामध्ये महसूल,ग्रामविकास,आरोग्य, शिक्षण, महावितरण आदी सर्व विभाग कर्मचारी उपस्थित राहत आहेत. त्यामुळे नागरिकांना थेट त्यांच्याशी संपर्क साधायला मिळत आहेत. यामुळे कार्यतत्पर असलेल्या भैया पुढे प्रश्न चुटकी सारखे सुटत असल्याने जे आमसभेत होत नाही ते आमदारानी भरवलेल्या ग्रामसभेत सुटत आहेत. विकास हा विषय असा आहे की तो कधीही न संपणारा आहे.मात्र किरण भैया आमदार झाल्यापासून अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.तसेच भैया स्वतः ग्रामस्थांच्या समस्या ऐकून मार्गी लावत असून ही माझी जबाबदारी असल्याचे सांगून मतदारसंघातील प्रत्येकाची मने जिंकत आहेत.

Breaking News

दैवज्ञ हितवर्धक समाज , आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याला दुहेरी मुकुट

दैवज्ञ हितवर्धक समाज,रत्नागिरी आयोजित रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने...