रत्नागिरीआमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत ओशिवले तालुका राजापूर येथील बागवेवाडीने केला शिवसेना...

आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत ओशिवले तालुका राजापूर येथील बागवेवाडीने केला शिवसेना पक्षात प्रवेश

आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत ओशिवले तालुका राजापूर येथील बागवेवाडीने केला शिवसेना पक्षात प्रवेश

लांजा राजापूर मध्ये येत्या काळात शिवसेनेची ताकद भक्कम करणार:- आमदार किरण सामंत

ओशिवले .राजापूर बागवेवाडी येथे उबाठाला खिंडार…

👉ओशिवले तालुका. राजापूर येथील बागवेवाडीमध्ये शिवसेना पक्षाला मोठे बळ मिळाले असून आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे राजापूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उबाठा गटाला मोठे खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
बागवेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भगवा हाती घेतला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी “शिवसेना पक्ष आणि आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही पक्षात प्रवेश करत आहोत” अशी भावना व्यक्त केली.
यावेळी बोलताना आमदार किरण सामंत यांनी, “लांजा-राजापूर मतदारसंघात विकासाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्याचे काम सुरू आहे. येत्या काळात शिवसेनेची ताकद अधिक भक्कम करून प्रत्येक गावात पक्ष संघटना मजबूत केली जाणार आहे,” असे प्रतिपादन केले. तसेच विरोधकांकडून केवळ दिशाभूल करण्याचे काम सुरू असून जनतेचा वाढता पाठिंबा हा शिवसेनेच्या विकासकामांमुळे असल्याचे त्यांनी सांगितले.
गावागावातील तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडे आकर्षित होत असल्याचे चित्र सध्या दिसत असून बागवेवाडीतील हा पक्षप्रवेश त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कार्यक्रमावेळी शिवसेना रविंद्र नागरेकर, जिल्हा परिषद प्रतीक मटकर, मुन्ना खामकर, योगेश वाघधरे, आत्माराम सुतार, शैलेश साळवी, संदीप बारसकर, उमेश पराडकर, प्रल्हाद नारकर, बाबालाल फरास, आप्पा साळवी, सुनील गुरव, सरपंच नीलम हातनकर, संतोष कामतेकर, प्रसाद गुरव, गौरव सौरप, संतोष शेट्ये, मंगेश पांचाळ, केशव कामतेकर, आनंद गावकार, धोंडू पांचाळ पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, महिला भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षप्रवेशानंतर संपूर्ण परिसर भगवामय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...