रत्नागिरीआषाढी एकादशीनिमित्त जिल्हा.परिषद. आदर्श मराठी शाळा वहाळ येथे दिंडी उत्साहात

आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा.परिषद. आदर्श मराठी शाळा वहाळ येथे दिंडी उत्साहात

आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा.परिषद. आदर्श मराठी शाळा वहाळ येथे दिंडी उत्साहात–

👉वहाळ (चिपळूण): ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत “वहाळ येथील कृषीअस्तित्व व वाडेरु येथील कृषिविश्व” विद्यार्थी गटाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त जि. प. शाळा, वहाळ येथे विविध ग्रामीण पद्धती ने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली,

या कार्यक्रमाची सुरुवात जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांसोबत पारंपरिक आषाढी एकादशी दिंडीने करण्यात आली. टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाचा जयघोष करत शाळेतील विद्यार्थी आणि दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी गावातून दिंडी काढली. दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत रस्त्यावर भक्तिमय नृत्य सादर करून उपस्थित ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

त्यानंतर विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि भारतीय संस्कृतीचे जतन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.

या प्रसंगी जि. प. शाळेचे मुख्याध्यापक श्री.गायकवाड सर तसेच शेख मॅडम व जिल्हा परिषद आदर्श मराठी शाळा वहाळ , येथील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. त्यांनी कृषीतील विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

हा संपूर्ण उपक्रम कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी आणि ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात पार पडला.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...