रत्नागिरीइंद्रधनु युवा महोत्सवात रंगला युवा वर्गखाद्योत्सवाने जल्लोष्यात सुरुवात

इंद्रधनु युवा महोत्सवात रंगला युवा वर्गखाद्योत्सवाने जल्लोष्यात सुरुवात

नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय आणि नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाच्या  इंद्रधनु युवा महोत्सवाची जल्लोषात सुरूवात झाली असून या निमित्ताने विविध डेज आणि उपक्रमांनी रंगत आली आहे. खाद्योत्सव आणि बॉलिवूड डे ने डेजस सुरु झाले असून महाविद्यालयाचा जी.एस. ऋतिक चव्हाण याच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी परिषद हे डेज यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत.
या महोत्सवाची सुरुवात इंद्रधनु क्रीडा महोत्सवने करण्यात आली. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, क्रीडा अधिकारी
श्री. गणेश भिमराव जगताप. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुकुमार शिंदे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. सुशील साळवी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. ताराचंद ढोबाळे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून करण्यात आले. क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी, क्रिकेट , व्हॉलिबॉल, कॅरम, खोखो, बुद्धीबळ, धावने, रस्सीखेच, गोळाफेक अशा विविध स्पर्धा पार पडल्या. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व चषक देऊन गौरवण्यात आले.
इंद्रधनु युवा महोत्सवात गॉगल डे, रोज डे, चॉकलेट डे, बॉलिवूड डे, त्याच बरोबर पथनाट्य, फोटोग्राफी, मेहंदी, अंताक्षरी, फनिगेम, पाककला,  रांगोळी, ढोलवादन, फेसपेंटिंग, काॅमेडी एक्स्प्रेस, सिंगीग, परसनॅलिटी कॉन्टेस्ट आणि डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.  मंगळवारी बॉलिवूड डे साजरा करताना हिंदी सेने अभिनेता धर्मेद्र यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विदयार्थ्यांनी धर्मेंद्रजीचे विविध पेहराव केले होते. मेहंदी, रील मेकिंग आणि फोटोग्राफी या स्पर्धा मोठया प्रतिसादात पार पडल्या. महाविद्यालयात झालेल्या खाद्योत्सवामध्ये  विद्यार्थ्यांनी गरमा गरम चमचमीत पदार्थावर ताव मारला. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विध्यार्थ्यांचें 15 स्टॉल विविध मेन्यूनी सजले होते. शोर्मा, चिकन समोसा, पाणी पुरी, कटलेट, सुरती भेळ, चिनीस भेळ, फ्रँकी, केक कस्टर्ड, दाबेली बिस्कीट, ओरिया पॅनकेक, चिकन चाव, दहिवडा,मोदक, कॅम्प चिकन,चिकन फ्रँकी, वेज खिमा समोसा, शिरखुरमा, पेरू चाट, चिकू मिल्कशेक, विविध प्रकारचे मॉकटेल, फ्रेंच फ्राय, चिकण चिली,चिकन ६५, आदी पदार्थ खरेदी करण्यासाठी विध्यार्थ्यांनी गर्दी केली होती. या खाद्योत्सवाचे उदघाटन डॉ. दिलिप पाखरे, चेअरमन अभिजित हेगशेट्ये आणि संचलिका सीमा हेगशेट्ये, ऋतुजा हेगशेट्ये डॉ.अलिमियॉं परकार यांच्या हस्ते करण्यात आले.

Breaking News