रत्नागिरीउद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख पदावर प्रभारी निवड झाल्या बद्दल...

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख पदावर प्रभारी निवड झाल्या बद्दल दत्ता कदम यांचा सत्कार करताना शिवसैनिक…

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार माजी खासदार विनायक राऊत यांनी लांजा येथील निष्ठावंत शिवसैनिक दत्ता कदम यांची रत्नागिरी जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती केली असल्याने
शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या रत्नागिरीतील संपर्क कार्यालयात शिवसेना जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांचा सत्कार प्रभारी जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी रत्नागिरी तालुका महिला संपर्क संघटक सौ. वर्षा पितळे, उपतालुका प्रमुख विजय देसाई, युवासेना तालुका अधिकारी प्रसाद सावंत, किरण पडवळ, विभागप्रमुख प्रशांत सुर्वे, सलील डाफळे, अमित खडसोडे, मयुरेश पाटील, निखिल बने, पारस साखरे, अनिशा नागवेकर, अरुण नागवेकर, संतोष लिंगायत, समीर आखाडे उपस्थित होते.

Breaking News

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे मध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी ट्रेनिंग संपन्न…

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे आणि नाईक, मोटर्स चिपळूण (महिंद्रा अँड...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 22/09/2025

१) मंडणगड - 2.75 मिमी२) खेड - 44.85 मिमी३)...