रत्नागिरीएक्सप्रेस ट्रेनला थांबा मिळवल्याशिवाय माघार नाही--- प्रवासी संघटनेचा निर्धार

एक्सप्रेस ट्रेनला थांबा मिळवल्याशिवाय माघार नाही— प्रवासी संघटनेचा निर्धार

एक्सप्रेस ट्रेनला थांबा मिळवल्याशिवाय माघार नाही— प्रवासी संघटनेचा निर्धार.
विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेची तातडीची मीटिंग दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी विलवडे येथे संपन्न झाली. लांजा तालुका पूर्व भाग व राजापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी या सभेला आवर्जून हजेरी लावली. मागणी केलेल्या सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा, दुसऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती ,सुसज्ज वेटिंग रूम, पथदीप, स्टेशनवर येणारा रस्ता, अपंग व जेष्ठ नागरिकांसाठीचा असलेला रस्ता व त्यावरील काळोख ,खेड ते सावंतवाडी लोकल, प्रवासी शेड, स्वच्छता या व इतर मागण्यांसाठी प्राथमिक स्वरूपात निवेदन देऊनही रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष आणि काही वेळा खोटी माहिती देत असल्याने रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी 20 सप्टेंबर रोजी विलवडे रेल्वे स्थानकासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे या उपोषणासाठी बहुसंख्य प्रवाशांनी व नागरिकांनी हजर राहावे असे आवाहन करण्यात आले.
सदर उपोषणाची जबाबदारी विलवडे रेल्वे प्रवासी संघटना मुंबई व ग्रामीण दोघांनी घेऊन मोठ्या प्रमाणात उपोषणाचा कार्यक्रम यशस्वी करण्याचे ठरले असून यानंतर 23 -10 -26 रोजी बेलापूर कोकण रेल्वे कार्यालय येथे लाक्षणिक उपोषण होणार आहे .आणि त्यानंतर सुद्धा आमच्या मागण्या मान्य न झाल्यास किंवा रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास 23 नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणात रेल रोको आंदोलन करणार असा निर्धार सर्वांनी केला. यावेळी खास मार्गदर्शन मुंबई संघटनेचे सल्लागार श्री. सुभाष लाड यांनी केले. यावेळी स्थानक प्रमुख श्री सुबोध भाटकर यांना संघटना कार्यकारणी तर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेची नवीन कार्यकारणी व सल्लागार मंडळाची निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून श्री .जगदीश राजापकर .श्री. दिलीपभाऊ पळसुलेदेसाई. श्री .आत्माराम चव्हाण. श्री. रवींद्र खामकर, श्री. डॉक्टर एस व्ही कदम. श्री. सत्यवान विष्णू खामकर .श्री. किशोर नारकर .इत्यादींची निवड करण्यात आली तर कार्यकारणी खालील प्रमाणे.
1) अमोल मारुती रेडीज, अध्यक्ष
2) सुरेश सिताराम शिगम, उपाध्यक्ष
3) भास्कर श्रीपत खामकर, उपाध्यक्ष
4) संतोष श्रीधर चव्हाण, उपाध्यक्ष
5) दीपक तुकाराम तोरस्कर, सरचिटणीस.
6) श्री राजेश विठोबा बेर्डे, सहचिटणीस.
7) श्री अन्वर रखांगी, खजिनदार
तर सदस्य म्हणून
प्रकाश तानू राजपकर, युवराज मारुती हांदे, श्री संजय आयरे, विजय मुरलीधर कदम, विवेक विजय काटकर, काशीराम राजाराम राजापकर, शशिकांत महादेव खामकर, अमर गणपत खामकर, अजय आत्माराम चव्हाण, दीपक दत्ताराम कानसे, श्री संतोष कदम, अमोल दीपक कदम, मंगेश दत्ताराम जाधव, प्रतीक प्रकाश मांडवकर, उमेश वामन खामकर. इत्यादींची निवड करण्यात आली.
आम्ही मुंबई व ग्रामीण प्रवासी संघटना मिळून माननीय खासदार नारायणराव राणे साहेब स्थानिक आमदार भैय्या उर्फ किरण सामंत पालकमंत्री उदय जी सामंत. श्री प्रमोद जठार साहेब ,श्री रवींद्र चव्हाण साहेब ,श्रीराम कदम साहेब, नाईक साहेब, इत्यादीना निवेदने दिली असून या सर्वांच्या सहकार्याने आमची सर्व कामे होतील असा विश्वास नूतन कार्यकारणी सल्लागार यांनी दाखवला वेळोवेळी या सर्वांचा सल्ला घेतला जाईल असेही नमूद करण्यात आले.

Breaking News

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...

Πληρωμές & Δεσμεύσεις στο Spinsy casino

Οι κυβερνο βηματα στη διαδικτυακή ντόπια επιχείρηση έχουν εξελιχθεί,...