महाराष्ट्रएप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी; माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची...

एप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी; माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

कृत्रिम बुद्धीमत्ता जेम्हणजेच एआयचा वापर सर्वच क्षेत्रात करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने देखील एआयसाठी धोरण आखायला सुरुवात केली असून महाराष्ट्राची एआय पॉलिसी एप्रिल महिन्यात येईल, अशी घोषणा माहिती व तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार यांनी विधानपरिषद सभागृहात केली आहे.

केरळ आयरस अशी एक एआय टिचर निर्माण करण्यात आली आहे. एआय चांगल्या दृष्टीने शिक्षणात येणे क्रांती ठरेल, आपण यासंदर्भात एक समग्र धोरण आणावं, असा प्रश्न भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला होता.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे, यासाठी राज्याचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करण्याचे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आधीच दिले होते. ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्याोग-व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळतील व तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करू शकेल, असे देखील शेलार यांनी सांगितले.

Breaking News

ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत विद्यार्थी गुणगौरव आणि मार्गदर्शन सोहळा संपन्न

रत्नागिरीच्या मातीत घडणाऱ्या आणि भविष्यात देशाचं नेतृत्व करू पाहणाऱ्या...

महाराष्ट्र भाजप चे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट-

प्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर रविंद्र चव्हाण यांची पंतप्रधान मोदींशी झाली पहिलीच...