आर्थिककर्जफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याने दंडासह कारावासाची शिक्षा

कर्जफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याने दंडासह कारावासाची शिक्षा

चिपळूण:- कर्जफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याने सावडे येथील गुरुकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे कर्जदार महेंद्र काशिराम कुंभार याला येथील न्यायालयाने ५१ हजार ५८० रूपये दंड ठोठावून एक महिना साधी कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

तालुक्यातील सावर्डे येथील गुरुकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडून महेंद्र कुंभार याने १ लाखांचे कर्ज घेतले होते. कर्जफेडीपोटी त्याने पतसंस्थेच्या नावाने ३१ हजार रूपयांचा धनादेश दिला होता. तो धनादेश न वटल्याने त्याच्याविरोधात पतसंस्थेने न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या १३८ कलमांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केला होता. या फौजदारी गुन्ह्याच्या कामी महेंद्र कुंभार याला शिक्षा करणेत आलेली आहे.

चिपळूणचे मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.आर. काळे यांनी त्याला ५१ हजार ५८० रूपये दंड ठोठावून त्यापैकी ५१ हजार ५८० रूपये नुकसान भरपाई म्हणून गुरुकृपा पतसंस्थेला देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच एक महिना साधी कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न दिल्यास १५ दिवस जादा साधी कारावासाची शिक्षा सुनावणेत आलेली आहे.

Breaking News

सावर्डे विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न

सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक...

रत्नागिरी नगरपरिषदेच्या कचरा व्यवस्थापनाला आता मिळणार गती

राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने सुमारे २ कोटी ९३...