Uncategorizedकोंडगाव बाइंगवाडी येथे इच्छापूर्ती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिरातील धार्मिक सोहळा भक्तिमय...

कोंडगाव बाइंगवाडी येथे इच्छापूर्ती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिरातील धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

कोंडगाव बाइंगवाडी येथे इच्छापूर्ती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिरातील धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव-बाईंगवाडी येथे नेरूळ नवी मुंबई इच्छापूर्ती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिर यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेला भव्य धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घेतला.


संपूर्ण कार्यक्रम ॐ श्री श्री १००८ महामंडलेश्वर सद्गुरू दिगंबरानंद सरस्वती स्वामी यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली पार पडला. त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा आणि कार्याचा प्रभाव संपूर्ण परिसरात जाणवत असून, समाजात भक्ती, संस्कार आणि अध्यात्माची जागृती करण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक भाविकांना आध्यात्मिक दिशा मिळत असून, दत्तभक्तांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष श्रद्धा आणि आदरभाव आहे.
या दोन दिवसीय कार्यक्रमात श्री सत्यदत्त पूजन, शिवपिंडीवर बिल्वपत्र अभिषेक, दत्तयज्ञ, सामूहिक पारायण, हरिपाठ, प्रवचन, भजन, महाआरती तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक विधी आणि मंत्रोच्चारांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित भाविकांनी अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिराचे पदाधिकारी, सभासद,कोंडगाव-बाईंगवाडी सावंत बंधू व ग्रामस्थ यांच्या वतीने मेहनत घेण्यात आली.

Breaking News

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...

Проверенные индивидуалки Москвы: как не ошибиться

Москва — город возможностей. Но поиск реальной анкеты среди...