रत्नागिरीकोकणातील पारंपारिक लोककला 'नमन' आणि 'जाखडी' या कलाप्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने...

कोकणातील पारंपारिक लोककला ‘नमन’ आणि ‘जाखडी’ या कलाप्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, नमन व जाखडी कलाकार संघटनांच्या वतीने रत्नागिरीतील जयेश मंगल कार्यालय येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले

कोकणातील पारंपारिक लोककला ‘नमन’ आणि ‘जाखडी’ या कलाप्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, नमन व जाखडी कलाकार संघटनांच्या वतीने रत्नागिरीतील जयेश मंगल कार्यालय येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असता राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी या समारंभास सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री.आशिषजी शेलार यांच्यासह उपस्थित राहून कलाकारांशी संवाद साधला.

यावेळी संवाद साधतांना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी आपली संस्कृती आणि कला जिवंत ठेवणाऱ्या या कलाकारांचा सत्कार हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. कोकणची लोककला जागतिक स्तरावर पोहोचावी आणि कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी आम्ही अविरत प्रयत्नशील असून, या लोककलाकारांच्या पाठीशी राज्य सरकार सदैव खंबीरपणे उभे असल्याची, ग्वाही दिली.

यावेळी आमदार किरणभैया सामंत, आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, राजेंद्रजी महाडिक, रत्नागिरी नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे, बंड्याशेठ साळवी, नमन मंडळाचे श्री. प्रभाकर कांबळे, जाखडी मंडळाचे श्री. शांताराम मालप यांच्यासह कोकणातील नमन व जाखडी लोककलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मांडकी पालवण कृषी महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मांडकी पालवण कृषी महाविद्यालयात विविध क्रीडा...

Где найти реальные анкеты в Москве: карта проверенных ресурсов

Рынок интимных услуг в Москве — это не стихийный...