कोकणकोकण रेल्वे मार्गावर धावणार होळी स्पेशल रेल्वे गाड्या--

कोकण रेल्वे मार्गावर धावणार होळी स्पेशल रेल्वे गाड्या–


अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्या मागणीच्या विनंती ला मान देऊन कोकण रेल्वे मार्गावर होळी स्पेशल रेल्वे चालवल्या जाणार आहेत,तरी या सेवेचा कोकणातील चाकरमन्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे
१) ट्रेन नं. ०११५१/५२ – CSMT ते मडगाव
ही रेल्वे CSMT वरून गुरूवार दि. ६ मार्च व १३ मार्च २०२५ रोजी रात्री १२.२० मि.सुटेल तर मडगाव वरून त्याच दुपारी २.१५ मि.नी मुंबईसाठी निघेल.
हॉल्ट : दादर,पनवेल,पेन,रोहा,माणगाव,खेड,चिपळूण,संगमेश्वर,रत्नागिरी,आडवली,विलवडे,राजापूर,वैभववाडी,कणकवली,कुडाळ,सावंतवाडी व थिविम येथे थांबेल.
२) ट्रेन नं. ०११२९/३० कुर्ला ते मडगाव
ही रेल्वे गुरूवारी दि.१३ मार्च व २० मार्च २०२५ रोजी कुर्लावरून रात्री १०.१५ मि.सुटेल तर दुसऱ्या दिवशी दुपारी १.४० मि.नी मडगाव वरून मुंबईसाठी निघेल.
हॉल्ट :
ठाणे,पनवेल,पेन,रोहा,माणगाव,वीर,खेड,चिपळूण,संगमेश्वर,रत्नागिरी,आडवली,विलवडे,राजापूर,वैभववाडी,नांदगाव,कणकवली,सिंधुदुर्ग,कुडाळ,सावंतवाडी,थिवीम व करमळी येथे थांबेल.
आरक्षण :
आरक्षण मंगळवार दि.२४ फेबुवारी २०२५ रोजी सकाळी ८ वा.सुरू होईल.
तरी कोकणातील चाकरमन्यांनी ह्या सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

Breaking News