रत्नागिरीकोणत्याही प्रकारचा गाजावाजा व प्रसिद्दी न करता गरीब व गरजु रुग्णांना मोफत...

कोणत्याही प्रकारचा गाजावाजा व प्रसिद्दी न करता गरीब व गरजु रुग्णांना मोफत आरोग्य सेवा देत राहणार असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे…

कोणत्याही प्रकारचा गाजावाजा व प्रसिद्दी न करता गरीब व गरजु रुग्णांना मोफत आरोग्य सेवा देत राहणार असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे… आजार काय असतो याचा काही दिवसांपूर्वी मला ही अनुभव आला आहे असे पालकमंत्री डॉ उदय सामंत रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात आयोजित मोफत आरोग्य शिबीराच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले आणि गरीब व गरजू रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत राहणार अशी ग्वाही दिली ‌‌. महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन डॉक्टर उदय सामंत यांच्या उपस्थितीत प्रमुख डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आले.. तसेच उपस्थित सर्व डाक्टरांचे स्वागत ही करण्यात आले.या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला मुंबई व पुणे येथील प्रमुख डॉक्टर तसेच उपमुख्यमंत्री आरोग्य सेवा केंद्राचे प्रमुख मंगेश चिवटे व इतर मान्यवर आणि रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते

Breaking News