रत्नागिरीखेड मध्ये छत्रपती शिवाजीमहाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान दि. 18 फेब्रुवारी ते...

खेड मध्ये छत्रपती शिवाजीमहाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान दि. 18 फेब्रुवारी ते 5 मार्च 2026 च्या कालावधीत अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज

खेड मध्ये छत्रपती शिवाजीमहाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान दि. 18 फेब्रुवारी ते 5 मार्च 2026 च्या कालावधीत अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज
खेड :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजीमहाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन तहसिलदार श्री सुधीर सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यासाठी आणि ते यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शासनाच्या लोकोपयोगी आणि शेतकऱ्यांच्या हितार्थ योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा. असे आवाहन प्रांत अधिकारी श्रीमती वैशाली पाटील व तहसिलदार श्री. सुधीर सोनावणे यांनी तहसिलदार कार्यालयाच्या तहसिलदार यांच्या दालनात गुरुवार दि. 5 मार्च 2026 रोजी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत केले.
सदरचे शिबिराचे आयोजन पुढील प्रमाणे गुरुवार दि. 26/2/2026 रोजी प्रेसनोट प्रसिध्दीला देण्यात आली. सर्व मंडळ अधिकारी कार्यालय, सर्व ग्राम महसुल कार्यालय, सर्व ग्रामपंचायत कार्यालय,सर्व सी एस सी सेंटर येथे प्रसिध्द करण्यात आले. सर्व मंडळ अधिकारी आणि ग्राम महसुल अधिकारी यांची संयुक्त एकत्रित बैठक घेण्यात आली. 1) शनिवार दि.7/3/2026 रोजी बोरज येथील ज्ञानदीप बोरज सभागृह, भोस्ते मंडळ, 2) रविवार दि.7/3/2026 रोजी सुकिवली येथे तळे मंडळ, 3) मंगळवार दि. 10/4 कुळवंडी, 4) बुधवार दि. 11/4/2026 रोजी कोरेगांव, 5) दि. 4/5/2026 रोजी खेड नपा. सभागृह,6) दि. 9/5/2026 रोजी आंबवली, 7) दि. 9/5/2026 रोजी दस्तुरी, 8) शनिवार दि. 14/3/2026 रोजी धामणंद, 9) रविवार दि. 15/3/2026 रोजी आंबडस, 10) रविवार
दि. 15/4/2026 रोजी आवाशी, 11) शिव येथे ते 5 मार्च 2026 रोजी मंडळ स्तरावर पुर्व तयारी करणे गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, खेड नगर परिषद, उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय खेड, तालुका कृषी अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती खेड यांची तालुकास्तरावर बैठक घेणे, शाळा निहाय विविध प्रकारचे दाखल्यांसाठी अर्ज व विहित नमुन्याचे कागदपत्र घेणे, विविध प्रकारचे दाखले कामी शिबिरासाठी मंडळ अधिकारीस्तरावर आधार सेंटरचे नियोजन करणे तसेच भोगावटदार वर्ग 2 च्या जमिनी भोगावटदार 1 मध्ये परावर्तीत करण्यात आल्या कि नाहीत याची तपासणी करणे, बाकी असल्यास त्याबाबत प्रक्रिया पूर्ण करणे,अद्ययावत नोंदीचा 7/12 लाभार्थींना वितरीत करणे, मंडळातील पानंद रस्त्याची प्रशासकीय मान्यतेचे आदेश ग्रामपंचायतीला उपलब्ध करून देणे, सर्वासाठी घरे अंतर्गत पट्टे वाटपासाठी बाकी राहीलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करणे, शासन निर्णयातील तरतुदीनुसार शिबिरात पट्टे वाटप करणे, जिवंत 7/12 मोहीम अंतर्गत गावामध्ये 7/12 उता-याचे वाचन करणे आणि प्रलंबित नोंदणीच्या याद्या तयार करणे व दुरुस्तीबाबत कार्यवाही करणे, तुकडेबंदी कायद्याविरोधात दि 15/11965 ते दि. 15/10/2024 पर्यंत प्रमाणभुत सीमेपेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार व हस्तांतर करणेबाबत गावनिहाय यादी तयार करणे, नोंदणीकृत दस्ताचे आधारे रद्द झालेली तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघनामुळे 7/12 मधील इतर अधिकारातील खरेदीदारांची नांव इतर अधिकारात नोंदविलेले शेरे व नव्याने प्राप्त अर्जाविषयी फेरफार घेणे, मंडळस्तरावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, 7/12 उता-यामधील चुकांबाबत अर्ज स्विकारुन आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी करून दुरुस्त्यांची नोंद घेणे, पुरवठा विभागाकडून अंत्योदय अन्न योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, अशा पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचा लाभ देणे. अशा प्रकारे छत्रपती शिवाजीमहाराज महाराजस्व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ ग्रामीण भागातील जनतेने घ्यावा. असे आवाहन तहसीलदार श्री सुधीर सोनावणे यांनी केले आहे.

Breaking News

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पा मध्ये पालकमंत्री डॉ.उदय सामंतांची बल्ले बल्ले

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पा मध्ये पालकमंत्री डॉ.उदय सामंतांची बल्ले बल्ले.....

जिष्णू देव वर्मा बनले महाराष्ट्राचे नवे राज्यपाल.

👉केंद्र सरकारने देशातील 9 राज्यांच्या राज्यपाल आणि काही...