महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने प्राथमिक, माध्यमिक ,उच्च माध्यमिक शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यातील ‘ गणित व विज्ञान जादूगार’ स्पर्धेत एम एस के प्राथमिक विद्यालय चुनाभट्टी येथील श्री भरत पाटील यांनी गणिती जादूंचे सादरीकरण करत संपूर्ण बृहन्मुंबई तून प्रथम क्रमांक पटकावला . राज्यस्तरीय अंतिम स्पर्धा नंदुरबार येथे संपन्न झाली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून व विभागातून विजयी 40 गुणवंत शिक्षक व अधिकारी यांनी अंतिम फेरीत गणित व विज्ञान जादू सादर केल्या. यांत मुंबई चे प्रतिनिधित्व करत श्री भरत पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून 10 वा क्रमांक मिळवला आहे. या उज्ज्वल यशाबद्दल प्रजासत्ताक दिनी शाळेच्या अध्यक्षा सन्मा. प्रमिला गोस्वामी मॅडम, सचिव सन्मा प्रणिता भारती मॅडम यांनी चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गजानन गोटे साहेब यांचे शुभहस्ते श्री भरत पाटील यांना सन्मानित केले. याप्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री विश्वास निकुंभ प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीम संगीता सरमळकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
URC- 9, मुंबई विद्याप्राधिकारण , बृहन्मुंबई मनपा शिक्षण विभाग, शाळेचे विद्यार्थी, पालक व परिसरातील सर्व घटकांतून कौतुक होत आहे. 💐💐
