रत्नागिरीगणेशमूर्ती विसर्जना दरम्यान दोन जण नदीत बुडाले; एकाचा मृत्यू.

गणेशमूर्ती विसर्जना दरम्यान दोन जण नदीत बुडाले; एकाचा मृत्यू.

रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील अलसुरे येथील भोस्ते गावात दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना दोन जण जगबुडी नदीत बुडाले. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. तर, दुसऱ्या तरुणाने कसेबसे पोहत किनारा गाठला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश पाटील (वय, ४०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगेश पाटील हे खेड तालुक्यातील भोस्ते पाटीलवाडीचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. यावर्षी पहिल्यांदाच त्यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. दरम्यान, गुरुवारी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मंगेश पाटील आणि त्यांच्यासोबत आणखी एक तरुण नदीपात्रात उतरले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पाण्यात बुडू लागले. त्यापैकी दुसर्‍या तरुणाने कसेबसे पोहत किनारा गाठला. पण मंगेश पाटील हे पाण्यात बुडाले.
या घटनेची माहिती मिळताच खेड नगर परिषदेचे अग्निशामक दल, खेड शहरातील विसर्जन कट्टा पथक तसेच खेड रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. सर्व यंत्रणेने तातडीने मंगेश पाटील यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरु होता.मात्र दुसऱ्या दिवशी शोध पथकाला त्याचा मृतदेह सापडून आला…

Breaking News