रत्नागिरीगोळप ग्रामपंचायत येथे वित्तीय साक्षरता सप्ताह 2026 अंतर्गत शिबिर

गोळप ग्रामपंचायत येथे वित्तीय साक्षरता सप्ताह 2026 अंतर्गत शिबिर

रत्नागिरी (जिमाका) : जिल्हा अग्रणी बँक, (बँक ऑफ इंडिया) रत्नागिरी तर्फे गोळप ग्रामपंचायत सभागृह येथे वित्तीय साक्षरता तसेच डिजिटल फसवणूक बाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार देशातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीमध्ये वित्तीय साक्षरता निर्माण करणे या उद्देशाने दि. 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत वित्तीय साक्षरता सप्ताह 2026 चे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने, बँक ऑफ इंडियाचे आंचलिक प्रबंधक नरेंद्र रघुनाथ देवरे आणि उपआंचलिक प्रबंधक अंजनी कुमार सिंह आज़ाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अग्रणी बँक, (बँक ऑफ इंडिया) रत्नागिरी तर्फे दि.12 फेब्रुवारी रोजी गोळप ग्रामपंचायत सभागृह येथे वित्तीय साक्षरता तसेच डिजिटल फसवणूक बाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात बँक ऑफ इंडिया पावस शाखा व्यवस्थापक रचना भोसले, गोळप गावाचे सरपंच प्रियंका सुर्वे, उमेद प्रभाग संघ अध्यक्ष श्रावणी देसाई, उमेद प्रभाग संघ व्यवस्थापक सीमा सुर्वे, प्रभाग संघ सचिव सुप्रिया लालगे आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिराला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय समावेशन आणि विकास विभाग, मुंबई क्षेत्रीय कार्यालयाचे प्रबंधक तथा आरबीआय लीड डिस्ट्रिक्ट ऑफिसर रत्नागिरी कु. बेनज़िर शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी री-केवायसी का आवश्यक आहे, सी-केवाईसी, मनी म्यूल खाते याबाबत पीपीटी प्रेजेंटेशन व विडियोद्वारे मार्गदर्शन केले. तसेच, डिजिटल फसवणूक टाळण्याचे उपाय आणि “डिजिटल अरेस्ट” या महत्त्वाच्या विषयावर जनजागृती केली.

अग्रणी जिल्हा व्यवस्थापक श्री. दर्शन दत्ताराम कानसे यांनी डिजिटल आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले

या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 160 हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराचे यशस्वी आयोजन प्रबंधक (वित्तीय समावेशन) विजय पाटील, आणि बँक ऑफ इंडिया पावस शाखा टीमने केले. तसेच शिबिराकरिता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या शिबिरामुळे स्थानिक लोकांना विविध वित्तीय योजना आणि सेवा समजून घेण्याची संधी लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक (वित्तीय समावेशन) विजय पाटील यांनी केले.

Breaking News