घरगुती गॅस सिलेंडर दरवाढ व टंचाई विरोधात रत्नागिरी जिल्हा काँग्रेस आक्रमक.. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना दिले लेखी निवेदन—
घरगुती गॅस सिलिंडर दरवाढ व टंचाई विरोधात आज रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना लेखी निवेदन सादर केले. आखाती देशांमध्ये युद्ध परिस्थती असल्यामुळे भारतातील सरकारने एल पी जी गॅस सिलिंडरच्या किमती वाढविल्या आहेत.
तसेच कमर्शियल गॅस सिलेंडर पुरवठा बंद केल्यामुळे हॉटेल, खानावळी, रेल्वे, हॉस्पिटलच्या कॅन्टीन, महावितालयाच्या कॅन्टीन यांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून अनेक हॉटेल व्यावसायिक देखील संकटात सापडले आहेत. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये साठ रुपयांची वाढ केली आहे त्यामुळे याची झळ सर्वसामान्यांना बसणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णया विरोधात रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना निवेदन सादर केले. पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती वाढलेल्या असताना त्याचा भार सर्वसामान्य नागरिकांवर पडू दिला नव्हता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या काळात एल पी जी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करून सर्वसामान्य लोकांची आर्थिक कोंडी केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या जनविरोधी धोरणा विरोधात रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, रत्नागिरी काँग्रेस शहर अध्यक्ष अशफाक काद्री, लांजा तालुकाध्यक्ष राजेश राणे, कौशल फाळके, नंदन गांगण, पांडू काका कवितके,अशफाक झारी. अशोक जाधव, अल्ताफ ठाकूर, जैनुल सारंग, इरफान होडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
