रत्नागिरीचारा प्रक्रिया तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

चारा प्रक्रिया तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

चारा प्रक्रिया तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन–

👉चिपळूण- निवळी तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत निवळी येथे शेतकऱ्यांसाठी वाळलेल्या चाऱ्यावर युरिया प्रक्रिया (Fodder Treatment) या विषयावर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना वाळलेल्या कडबा व इतर कोरड्या चाऱ्यावर 4% युरिया द्रावणाची प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता कशी वाढवता येते, याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच प्रक्रिया केलेला चारा 21 दिवस झाकून ठेवून नंतर हवेत वाळवून जनावरांना द्यावा, अशी माहिती देण्यात आली.
यावेळी चारा प्रक्रियेचे फायदे, जनावरांच्या पचनक्षमतेत होणारी वाढ, दूध उत्पादनात होणारी सुधारणा तसेच कमी खर्चात सकस चारा उपलब्ध करून देण्याचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी या प्रात्यक्षिकाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.
या उपक्रमामुळे आधुनिक पशुपालन तंत्रज्ञानाचा प्रसार होऊन जनावरांचे आरोग्य सुधारण्यास व दुग्ध उत्पादन वाढविण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमास परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
हा उपक्रम कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम ,जिजामाता कृषी महाविद्यालय यांच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे ,उपप्राचार्य श्री.बाळासाहेब सूर्यवंशी आणि ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा.प्रशांत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
शाळेच्या वतीने रावे विद्यार्थिनी आणि कृषी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे आभार मानण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषीदुत कु. देवयानी गुरव ,दीक्षा कांबळे ,गौरी बंडगर, क्रांती देवकर ,तेजल भिंगारदिवे सुप्रिया धामणीकर ,नम्रता अहिरे ,सुहानी घाडगे ,समीक्षा स्पर्धे यांनी विशेष परिश्रम घेतले आणि हा उपक्रम अत्यंत यशस्वी व संस्मरणीय ठरला.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...