Modal title

चिपळूणचिपळूण-कराड रेल्वेमार्ग लवकरच मार्गी लावणार खासदार सुनिल तटकरे यांची ग्वाही--

चिपळूण-कराड रेल्वेमार्ग लवकरच मार्गी लावणार खासदार सुनिल तटकरे यांची ग्वाही–

केंद्रीय रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांची भेट घेणार
चिपळूण: कोकण आणि पश्चिम
महाराष्ट्रातील चिपळूण-कराड रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. याची आपल्याला जाणीव आहे.या प्रलंबित प्रकल्पासाठी आपण केंद्रीय रेल्वेमंत्री,राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री यांची लवकरच भेट घेणार आणि हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अनुभवाची पराकाष्ठा करणार,असे आश्वासन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व रायगड-रत्नागिरीचे खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे..रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सावर्डे येथे जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत चिपळूणचे माजी सभापती व प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम यांनी या संदर्भात राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता.या संदर्भात मुकादम बैठकीत म्हणाले, चिपळूण-कराड रेल्वेमार्गाचा प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित आहे.हा प्रकल्प मार्गी लागल्यास कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठा फायदा होऊ शकतो.तसेच मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे ही कराड येथे एकत्र येऊ शकते.त्याचा फायदा या दोन्ही रेल्वेमार्गाना होऊ शकतो.आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूण-कराड रेल्वेमार्गाच्या कामाचे ऑनलाईन पद्धतीने भूमीपूजन देखील केले होते.मात्र,त्यानंतर हा प्रकल्प प्रलंबित आहे.

Breaking News