चिपळूणचिपळूण नं.१ बीट स्तरीय क्रिडा स्पर्धेत गोवळकोट केंद्रातील चिपळूण उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांची...

चिपळूण नं.१ बीट स्तरीय क्रिडा स्पर्धेत गोवळकोट केंद्रातील चिपळूण उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

तालुका स्तरावर विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी
चिपळूण – चिपळूण नं.१ च्या हिंवाळी क्रिडा स्पर्धा २०२५/२०२६ बीट विस्तार अधिकारी आस्माॅंकौसर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बीट मधील सर्व केंद्र प्रमुखांच्या सहाय्याने अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
या हिंवाळी क्रिडा स्पर्धेत बीट मधील एकूण पांच केंद्रातील विद्यार्थ्यांनी इटली कार्यकुशलता आणि खेळाडूवृत्तीने सर्वांची मने जिंकली.
या स्पर्धेत चिपळूण उर्दू शाळेतील खंसा सरफराज सय्यद हिने मुलींच्या लहान गटात थालीफेक मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तर मुनीरा महबूब शेख हिने मुलींच्या लहान ५० मीटर धावण्यात प्रथम क्रमांक तर मुलींच्या लहान गटात उंच उड़ी मारण्यात द्वितीय क्रमांक पटकावला .
दोन्ही विद्यार्थीनींना बीट विस्तार अधिकारी देसाई मॅडम , केंद्र प्रमुख अब्दुलरऊफ सुर्वे , शिक्षक संघाचे अध्यक्ष अजय गराटे , मुख्याध्यापक शौकत कारविणकर , राहीन नेवरेकर , जमील शेख , अब्दुल समद पटेल तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष , उपाध्यक्ष तसेच सदस्यांनी दोन्ही विद्यार्थीनींना तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेत कौशल्य दाखविण्यासाठी प्रेरणा आणि भरघोस शुभेच्छा दिल्या.

Breaking News