महाराष्ट्रजगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे रोहा येथे ४०० ब्लॅकेट कीटचे वाटप-

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे रोहा येथे ४०० ब्लॅकेट कीटचे वाटप-

पादुका दर्शन सोहळा उत्साहात


रायगड जिल्ह्यातील रोहा येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराजांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा रोहा येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला. यावेळी संस्थानाच्या दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमांतर्गत ४०० गरजूंना ब्लॅकेट कीटचे वाटप करण्यात आले.सुरुवातीला जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर सिद्ध पादुकांची रायकर पार्क नगर पालिका ते गौळवाडी मैदान अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. गौळवाडी मैदानावर दर्शन सोहळा झाला. भक्तांनी रांगेने दर्शन घेतले. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते गरजूंना ब्लँकेट कीट वाटपाचा कार्यक्रम झाला. या कीटमध्ये उशी, चादर, चटई यांचा समावेश आहे. अशी ४०० कीट देण्यात आली.
मोलमजुरी करणाऱ्या तसेच हातावर पोट असणाऱ्या गरजूंची नेमकी प्राथमिक आवश्यकता ओळखून संस्थानाने केलेल्या या मदतीबद्दल लाभार्थ्यांनी आभार मानले आहेत.
यावेळी रोह्याचे माजी नगराध्यक्ष लालता सेठ कुशवाह, ओबीसी जिल्हा अध्यक्ष सुरेश शेठ मगर, ओबीसी रोहा तालुका अध्यक्ष अनंत थिटे, तंटा मुक्ती अध्यक्ष मोरेश्वर त्ररिवले, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश खराडे, अमोल सांगले, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष किरण मोरे, नंदू महाराज तेलंगे आदी मंडळी उपस्थित होती. तसेच स्वस्वरूप संप्रदायाचे पदाधिकारी, तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व पाहुण्यांनी संस्थानच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

Breaking News

ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत विद्यार्थी गुणगौरव आणि मार्गदर्शन सोहळा संपन्न

रत्नागिरीच्या मातीत घडणाऱ्या आणि भविष्यात देशाचं नेतृत्व करू पाहणाऱ्या...

महाराष्ट्र भाजप चे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट-

प्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर रविंद्र चव्हाण यांची पंतप्रधान मोदींशी झाली पहिलीच...