जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे राजस्थान उपमुख्यमंत्र्यांनी घेतले आशीर्वाद
उदयपूर, राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद भैरवा यांनी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा गौरव करून आशीर्वाद घेतले. उदयपूर विमानतळावर ही भेट झाली. यांच्यासमवेत वल्लभनगर विभागाचे आमदार उदय लाल डांगी, रत्नागिरीच्या अरिहंत ग्रुपचे बांधकाम व्यावसायिक सुरेश सेठ गुंदेचा उपस्थित होते. सर्वांनी जगदगुरु रामानंदाचार्य नरेन्द्राचार्यजी यांचे उदयपूर नगरीते स्वागत केले.