जवळपास महिनाभर सुरू राहणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान या रोजे म्हणजेच उपवासाच्या महिन्याला सुरुवात झाली असल्याने मुस्लिम मोहल्यातील सर्व वातावरण रमजान मय बनले आहे.. रमजान महिन्यात पाच वेळच्या नियमित नमाज सह रात्री 8 वाजता तरावी चा विशेष नमाज अदा केला जातो आणि त्या करीता मोठ्यांपासुन लहानांपर्यंत सर्व जण मशीदीत जातात.. या महिन्यात रोजे म्हणजेच उपवास ठेवले जातात तसेच जास्तीत जास्त कुराण पठण केले जाते.. 29 किंवा 30 दिवसा नंतर चंद्र दर्शन झाले कि रमजान ईद साजरी केली जाते मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान या उपवासाच्या महिन्याला सुरुवात झाली असल्याने बाजारात केळी अननस.पपई.सफरचंद खजुर.कलिंगड.सरबत सह विविध प्रकारच्या फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच महिन्यात लहान मुले आणि मुली ज्यांना छोटे रोजदार म्हणतात ते दिवसभर रोजे ठेवतात आणि हे या महिन्याचे खास वैशिष्ट्य असते.. बऱ्याच वर्षानंतर यंदा फेब्रुवारी मध्ये रमजान आल्याने काही प्रमाणात वातावरणात गारवा असल्याने रोजेदारांना ऊन्हाचा जास्त त्रास होणार नाही असे बोलले जात आहे.. पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या सह सर्वच नेते मंडळींनी रमजान निमित्ताने मुस्लिम बंधु भगिनीना शुभेच्छा दिल्या आहेत… कोकण 24 तास न्यूज चॅनल तर्फे सर्व मुस्लिम बांधवांना रमजान च्या शुभेच्छा..
जवळपास महिनाभर सुरू राहणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान या रोजे म्हणजेच उपवासाच्या महिन्याला सुरुवात झाली असल्याने मुस्लिम मोहल्यातील सर्व वातावरण रमजान मय बनले आहे.
