जिल्हाध्यक्ष सौन्दळकर यांच्या हस्ते रत्नागिरी तालुक्यातील मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या जाहीर.
रत्नागिरी तालुक्यात व शहरात मनसेने गेल्या काही महिन्यात कमालीचा वेग पकडला आहे. अनेक आंदोलन, प्रश्न उपस्थित करून अनेक प्रवेश घेऊन आगामी निवडणूका अत्यंत गांभीर्याने घेतल्याचे दाखवून दिले आहे. तशातच महिला आघाडी मजबूत करताना शहरात महिला पदाधिकारी तसेच तालुक्यातील अनेक जी प गटातील नवनियुक्ती केल्या आहेत.
उपतालुकाध्यक्ष रुपेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने नाचणे जी प गटात दत्तात्रय काशिनाथ गुरव
विभाग अध्यक्ष (नाचणे),रोहित शशिकांत मुलुख शाखा अध्यक्ष (नाचणे),अनंत बाबू येडगे
उप शाखा अध्यक्ष (नाचणे),संकेत मंगेश खत्री
शाखा अध्यक्ष (खेडशी),प्रणव अनिल घाटकर गटअध्यक्ष(कारवंचीवाडी),आशिष कट्टीमणी उपविभागअध्यक्ष(कारवंचीवाडी),राहुल अनिल नलावडे गट अध्यक्ष (कातळवाडी) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर जिल्हा सचिव महेंद्र गुळेकर मा. तालुकाध्यक्ष सचिन शिंदे उपतालुकाध्यक्ष रुपेश चव्हाण शहर अध्यक्ष बाबय भाटकर शेतकरी सेना उपजिल्हाध्यक्ष भाई साळवी महिला शहर सचिव संपदा राणा कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम व इतर महाराष्ट्र सैनिक इत्यादी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष सौन्दळकर यांच्या हस्ते रत्नागिरी तालुक्यातील मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या जाहीर.
