Modal title

सांस्कृतिकजिल्हाभरात आजपासून नवरात्रोत्सवाची धूम; घरोघरी होणार घटस्थापना

जिल्हाभरात आजपासून नवरात्रोत्सवाची धूम; घरोघरी होणार घटस्थापना

रत्नागिरी:- गणेशोत्सवानंतर जिह्यात आजपासून सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम सुरू होणार आहे. गुरुवारी घरोघरी घटस्थापनेनंतर जिह्यात 425 ठिकाणी दूर्गामातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना 90 ठिकाणी फोटो पूजन, घरोघरी खाजगी तर काही ठिकाणी सार्वजनिक घटस्थापना करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी गरबाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवस जिल्ह्यात दांडीया आणि गरब्याची ‘धूम‘ सुरू राहणार आहे.

कोकणामध्ये पूर्वी ग्रामदेवतांच्या मंदिरांपुरताच घटस्थापना करण्यापर्यंत उत्सव मर्यादीत होता. मात्र ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये घटस्थापना करण्याबरोबरच एखाद्या वाडीवस्तीवर देवीची मूर्ती आणून तिची स्थापना करून, दांडीयाचे कार्यक्रम आयोजित करण्याची प्रथा मागील काही कालावधीपासून वाढीस लागली आहे. काही भागांमध्ये मात्र ग्रामदेवतांच्या मंदिरासमोरच हा उत्सव मोठय़ाप्रमाणात साजरा केला जातो. शहरांमध्ये मात्र गल्लोगल्ली व काही भागांमध्ये उत्सव साजरे करण्याचे प्रमाण वाढले आहे.
जिह्यात 425 ठिकाणी सार्वजनिक तर 62 खासगी ठिकाणी देवींच्या मुर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. 90 ठिकाणी देवीच्या फोटोंचे पूजन करून, दांडीया कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. अनेक ठिकाणी गरब्याचे आयोजन होणार असून 36 हजार 629 ठिकाणी खाजगी तर 174 ठिकाणी सार्वजनिक घटस्थापना केली जाणार आहे. गरब्याचे आयोजन प्रामुख्याने गुजराथी वस्ती असणाजया ठिकाणीच मोठय़ाप्रमाणात होत असल्याने जिह्यातील प्रमुख शहरांसह काही पंचक्रोशींच्या ठिकाणीही असे कार्यक्रम केले जाणार आहेत. रत्नागिरी शहरातदेखील मागील काही वर्षात नवरात्रोत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. नवरात्र उत्सव मंडळांसह अनेक ठिकाणी दांडीया स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याने या उत्सवाची रंगत आणखी वाढत आहे. दांडीया स्पर्धेत विशेष करून युवा पिढीचा सहभाग अधिक असल्याने राजकीय मंडळीदेखील या उत्सवाचा राजकीय फायदा करून घेण्यास पुढे सरसावलेले दिसून येतात.

Breaking News