रत्नागिरीजिल्हा परिषद रत्नागिरी सिंधुदुर्ग समृध्द योजना सन २०२३-२४ अंतर्गत पर्यटन वाढीस चालना...

जिल्हा परिषद रत्नागिरी सिंधुदुर्ग समृध्द योजना सन २०२३-२४ अंतर्गत पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला प्रभागसंघांना देण्यात येणाऱ्या हाऊसबोटचा लोकार्पण सोहळा जांभारी गावात राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते पार पडला.

जिल्हा परिषद रत्नागिरी सिंधुदुर्ग समृध्द योजना सन २०२३-२४ अंतर्गत पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला प्रभागसंघांना देण्यात येणाऱ्या हाऊसबोटचा लोकार्पण सोहळा जांभारी गावात राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते पार पडला.

महिलांच्या सक्षमीकरणा साठी असे प्रकल्प सुरु करत असल्याचा आनंद यानिमित्ताने होत असून रत्नागिरीमध्ये महिलांसाठी विविध प्रकारचे व्यवसाय बचत गटाच्या माध्यमातून सुरु होत आहेत. केरळनंतर कोकणात हा प्रकल्प सुरु करून पर्यटन वाढीसाठी चालना देणे हा यामागचा उद्देश आहे. कोकणातील राईबंदर नंतर जांबारी या ठिकाणी हा दुसरा प्रकल्प सुरु होत असून पुढील काळात अशा प्रकारच्या 10 हाऊसबोट रत्नागिरी जिल्ह्यात देणार असल्याचे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले. या हाऊसबोटवर उत्तम प्रतीच्या राहण्याच्या सुविधेबरोबर रुचकर भोजन व अतिशय उत्तम पाहुणचार आलेल्या पर्यटकांना करण्यात येणार आहे. राज्यातील नव्हे तर देशातील अतिशय उत्कृष्ट असा हा प्रकल्प होईल अशी अपेक्षा मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी व्यक्त केली.

यापुढील काळात ग्रामीण भागातील अनेक बचत गटांनी असे प्रकल्प सुरु करण्यासाठी पुढे आले पाहिजे. ग्रामीण भागातील महिलांनी अनेक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले असून भविष्यात विविध व्यवसायात महिलांनी पुढे येऊन व्यवसाय वाढविण्याची गरज आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला सक्षम होऊन ग्रामीण भागाचा विकास होईल असा विश्वास मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केला.

महिला बचत गटांसाठी महायुती सरकारच्या माध्यमातून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल अशी ग्वाही मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यनिमित्ताने दिली. तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी व स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही असेही आश्वासन मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिले. तसेच पुढील काळात आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांसाठी विविध प्रकारचे व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत करण्यात येईल असेही आश्वासन मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिले.

यावेळी जि.प.माजी सभापती शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, बाबुशेठ पाटील, सरपंच आदेश पावरी व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, बचत गटाचे पदाधिकारी, महिला मंडळ, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

जिल्हास्तरीय लोकशाही दिन’राईट टू एज्युकेशन’ प्रवेश प्रक्रियेबाबत सीईओनी चौकशी करावी- जिल्हाधिकारी मनुज जिंदल

जिल्हास्तरीय लोकशाही दिन'राईट टू एज्युकेशन' प्रवेश प्रक्रियेबाबत सीईओनी चौकशी...

निवळीमध्ये दहीहंडी उत्सवाचा जल्लोष; सात थरांवर दहीहंडी फोडत राजापुरातील जय हनुमान पथकाचा डंका

निवळीमध्ये दहीहंडी उत्सवाचा जल्लोष; सात थरांवर दहीहंडी फोडत राजापुरातील...