रत्नागिरीडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
सावर्डे : येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. यावेळी विद्यार्थिनी स्वरांगी पाटील, साक्षी गोरे तसेच विद्यार्थी युवराज रसाळ व स्वागत सरमळर यांनी मनोगते व्यक्त करत डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची महत्ता अधोरेखित केली.
यानंतर सहाय्यक शिक्षक रोहित गमरे यांनी आपल्या भाषणातून डॉ. आंबेडकर यांची जिद्द, चिकाटी आणि शिक्षणावरील निष्ठा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या घडण्यामागील अभ्यास पद्धती, भारतीय संविधान निर्मितीतील त्यांचे मोलाचे योगदान व संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
जयंतीनिमित्त विद्यालयात डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित आकर्षक भित्तिपत्रक तयार करण्यात आले होते. या भित्तिपत्रकाचे उद्घाटन एमसीव्हीसी विभाग प्रमुख हणमंत घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी अनघा कांबळे हिने केले, तर आभार प्रदर्शन तीर्था काकडे हिने मानले. या कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक विजय चव्हाण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

धामणसे गावात २०० नारळ रोपांचे वितरण

धामणसे गावात २०० नारळ रोपांचे वितरण 🔹श्री रत्नेश्वर ग्रंथालय; तीन...