चिपळूणडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे नवनिर्वाचित कुल सचिव डॉ. संतोष...

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे नवनिर्वाचित कुल सचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांची गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण येथे सदिच्छा भेट

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे नवनिर्वाचित कुल सचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांची गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण येथे सदिच्छा भेट

मांडकी, ता.चिपळूण –
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली चे नवनिर्वाचित कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांनी नुकतीच गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय तसेच जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांना सदिच्छा भेट दिली. कुलसचिवपदी निवड झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच भेट होती.
यावेळी बोलताना डॉ. सावर्डेकर म्हणाले, “आज मी या पदापर्यंत पोहोचलो, त्यामागे माननीय डॉ. तानाजीराव चोरगे सर यांचा लाखमोलाचा पाठिंबा व सततचे मार्गदर्शन हे एक कारण आहे. ” कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून या दोन्ही महाविद्यालयांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. कदम यांनी कुलसचिवांचे उत्स्फूर्त स्वागत व सत्कार केला व त्यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष निखिल चोरगे, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एस. एन. चोरगे,तसेच इतर प्राध्यापकवृंद उपस्थित होते.

Breaking News

हिंद दी चादर: महाराष्ट्राच्या मातीत गुंजणारा मानवतेचा जयघोष

महाराष्ट्राची भूमी ही मुळातच क्रांती आणि अध्यात्माचा एक अपूर्व...

‘गणित व विज्ञान जादूगार ‘ स्पर्धेत चुनाभट्टी येथील श्री. भरत पाटील सर यांचा राज्यात दहावा क्रमांक

महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने प्राथमिक, माध्यमिक ,उच्च माध्यमिक शिक्षक...