रत्नागिरीतालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत सावर्डे विद्यालयाचा द्वितीय क्रमांक

तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत सावर्डे विद्यालयाचा द्वितीय क्रमांक

तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत सावर्डे विद्यालयाचा द्वितीय क्रमांक
सावर्डे : चिपळूण पंचायत समिती व चिपळूण तालुका विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे यांनी द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.
ही स्पर्धा नुकतीच ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूल, वालोपे येथे उत्साहात पार पडली. सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘अवकाशातील मानवी वस्ती’ या विज्ञानाधारित नाटकाचे प्रभावी सादरीकरण करून परीक्षकांची दाद मिळवली.
या नाटकामध्ये तीर्थ काकडे, आर्या चव्हाण, आरोही चव्हाण, समर्थ मेणे, शार्दुल पाटील, निधी कुंभार, मिहीर चव्हाण आणि चैतन्य शंबेकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विज्ञानविषयक संकल्पना प्रभावी अभिनय, संवादफेक व सादरीकरणाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडल्या. नाटकाला विद्यालयातील कुमार स्वर्णिम भुवड व रुद्र वहाळकर यांनी संगीताची साथ दिली.
या नाट्यप्रयोगासाठी विद्यालयातील विज्ञान व गणित विषयाच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण व पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांनी सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
विद्यालयाने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार शेखरजी निकम, उपाध्यक्ष प्रशांतशेठ निकम, डॉ. इसाक खतीब, युगंधाराताई राजेशिर्के, कार्याध्यक्ष अनिरुद्धजी निकम, शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, सचिव महेशजी महाडिक, संस्थेचे सर्व पदाधिकारी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Breaking News

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...

Πληρωμές & Δεσμεύσεις στο Spinsy casino

Οι κυβερνο βηματα στη διαδικτυακή ντόπια επιχείρηση έχουν εξελιχθεί,...