रत्नागिरीदळवटणे बाग शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

दळवटणे बाग शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

दळवटणे बाग शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा–

👉जिल्हा परिषद आदर्श शाळा दळवटणे बागवाडी तालुका चिपळूण या शाळेत सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत हा कार्यक्रम पंचायत समितीच्या सदस्या सौ. मेघा योगेश इंगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला. यावेळी इयत्ता पहिली मध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले, तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शासनामार्फत पुरवण्यात आलेली मोफत पाठ्य पुस्तके व गणवेशाचे वाटप शाळा व्यवस्थापन समितीच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी मोरवणे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. भगवान हिरामण मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष शिक्षण तज्ञ स्थानिक प्राधिकरण प्रतिनिधी सदस्य व सर्व पालक उपस्थित होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अजित संतोष जाधव उपाध्यक्ष संदेश बळीराम साबळे स्थानिक प्राधिक प्राधिकरण प्रतिनिधी श्रुती संदेश इंगावले शिक्षणतज्ञ सदानंद बबन इंगावले तसेच पालक दिव्या दत्ताराम पवार, संचिता संकेत इंगावले, मीना किशोर साबळे, अविनाश इंगावले, संदेश सुभाष इंगावले, सारिका संतोष इंगावले, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.आकांक्षा अरविंद सकपाळ शिक्षिका श्रीम.वैशाली रमेश पेद्दावाड, अंगणवाडी सेविका ऋतुजा रुपेश इंगावले, मदतनीस प्राजक्ता सुहास वायकर इत्यादी सर्व उपस्थित होते. अतिशय उत्साह पूर्ण आणि आनंददायी वातावरणात शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे व सर्व पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Breaking News

Проверенные индивидуалки Москвы: как не ошибиться

Москва — город возможностей. Но поиск реальной анкеты среди...

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री रत्नागिरी :...