रत्नागिरीदापोलीत सीएनजीसाठी रिक्षांच्या लांबच लांब रांगा; रिक्षाचालक मेटाकुटीला

दापोलीत सीएनजीसाठी रिक्षांच्या लांबच लांब रांगा; रिक्षाचालक मेटाकुटीला

दापोलीत सीएनजीसाठी रिक्षांच्या लांबच लांब रांगा; रिक्षाचालक मेटाकुटीला

दापोली-दाभोळ रस्त्यावरील जालगाव जवळील पेट्रोल पंपावर गेल्या काही दिवसांपासून इंधन भरण्यासाठी रिक्षांच्या प्रचंड रांगा पाहायला मिळत आहेत. विशेषतः सीएनजी आणि पेट्रोल भरण्यासाठी रिक्षाचालकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून, यामुळे रिक्षा व्यावसायिक पूर्णपणे हवालदिल झाले आहेत.

दापोली-दाभोळ या मुख्य रस्त्यावर रिक्षांच्या रांगा लागल्यामुळे इतर वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होत आहे. सीएनजीचा पुरवठा कमी असणे किंवा पंपावरील तांत्रिक बिघाड यामुळे या रांगा वाढत असल्याचे प्राथमिक दर्शनी दिसत आहे. दिवसातील ३-४ तास केवळ रांगेत उभे राहावे लागत असल्याने रिक्षाचालकांचा कामाचा वेळ वाया जात असून त्यांच्या दैनंदिन उत्पन्नावर याचा मोठा परिणाम झाला आहे. यामुळे प्रवासी वाहतूक करणे कठीण झाल्याची व्यथा स्थानिक रिक्षाचालकांनी मांडली आहे.

सध्याची स्थिती पाहता सकाळी लवकर आणि सायंकाळच्या वेळी या रांगांची लांबी जालगाव गावाच्या वेशीपर्यंत पोहोचत आहे. दापोली शहरात इतर ठिकाणी सीएनजीची उपलब्धता मर्यादित असल्याने या एकाच पंपावर प्रचंड ताण येत आहे. रस्त्यावरील या रांगांमुळे अपघाताची भीती देखील व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने इंधन पुरवठा सुरळीत करावा आणि रांगांचे योग्य नियोजन करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...