रत्नागिरीदापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात पोलीस ॲक्शन मोडवर

दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात पोलीस ॲक्शन मोडवर

पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी कडक भूमिका घेतली असल्याने पर्यटकांयध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे आहे. दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, मुरुड बीचवर स्टंटबाजी खपवून घेतली जाणार नाही.

समुद्रकिनाऱ्यावर वाहन नेण्यास बंदी असताना नियम मोडणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्याच्या कडक कलमांखाली कारवाई सुरू करण्यात आली आहे. अनधिकृत वाहन प्रवेश रोखण्यासाठी प्रमुख मार्गांवर बॅरिकेट्स बसवण्यात आले असून, गर्दीच्या वेळेत कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पर्यटकांनी नियम पाळून मुरुड बीचची सुरक्षितता आणि शांतता राखावी, असे आवाहनही पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांनी केले आहे.

Breaking News

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे :...

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त गणपती पुळे येथे दर्शनासाठी लोटला जनसागर

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त गणपती पुळे येथे दर्शनासाठी लोटला...