रत्नागिरीदिनांक 23/10/2025 रोजी मौजे मजगाव ता . जिल्हा रत्नागिरी येथील श्री. आबीद...

दिनांक 23/10/2025 रोजी मौजे मजगाव ता . जिल्हा रत्नागिरी येथील श्री. आबीद अली अब्दुल हमीद काझी यांचे मालकीच्या आंबा कलम बागेतील कठडा असलेल्या विहिरीमध्ये बिबट्या वन्य प्राणी पडलेला असल्याची माहिती सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास मजगाव गावचे पोलीस पाटील अशोक केळकर यांनी वनपाल पाली यांना दूरध्वनी वरून माहीती दिली

दिनांक 23/10/2025 रोजी मौजे मजगाव ता . जिल्हा रत्नागिरी येथील श्री. आबीद अली अब्दुल हमीद काझी यांचे मालकीच्या आंबा कलम बागेतील कठडा असलेल्या विहिरीमध्ये बिबट्या वन्य प्राणी पडलेला असल्याची माहिती सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास मजगाव गावचे पोलीस पाटील अशोक केळकर यांनी वनपाल पाली यांना दूरध्वनी वरून माहीती दिली, त्याप्रमाणे तात्काळ परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना सदरची माहिती देऊन रेस्क्यू टीम,पिंजरा व आवश्यक त्या साहित्यासह घटनास्थळी येऊन पाहणी केली.

सदरची विहीर ही आंबा कलम बागेत असून ती कच्ची कठडा असलेली आयताकृती आहे ,विहिरीची लांबी सुमारे 15फूट, रुंदी 10फूटआणि खोली 25फूट आहे. पाण्याची पातळी 07ते 08फुटावर असून बिबट्या हा वन्य प्राणी विहिरीमध्ये असलेल्या दगडावर पाण्यात बसलेलाअसल्याचे दिसून आले‌ . त्यानंतर तात्काळ जाळीचे नेट विहिरीच्या सभोवार टाकून विहीर बंदिस्त करण्यात आली त्यानंतर पिंजऱ्याला दोऱ्या बांधून पिंजरा सुरक्षित विहिरीत सोडण्यात आला व बिबट्याला पिंजऱ्यामध्ये पंधरा मिनिटांचे आतच सुरक्षित पिंजऱ्यामध्ये घेण्यात आला . त्यानंतर मा पशुधन विकास अधिकारी मालगुंड श्री स्वरूप काळे यांच्याकडून बिबट्याची वैद्यकिय तपासणी करून घेतली.तो सुरक्षित असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले, तसेच सदरचा बिबट्या हा नर जातीचा असून तो सुमारे 6 ते 7 वर्षे वयाचा आहे, सदर विहिरीवर शेडनेट टाकलेले असून भक्षाचा पाठलाग करताना तो विहिरीत पडला असावा असा अंदाज स्थानिक परिस्थितीनुसार दिसुन येत आहे. सदर रेस्क्यूची कार्यवाही ही माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर कामगिरीसाठी श्री प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री न्हानू गावडे वनपाल पाली, श्री सारीक फकीर वनपाल लांजा श्रीमती ,श्री विराज संसारे वनरक्षक रत्नागिरी,शर्वरी कदम वनरक्षक जाकादेवी प्राणी मित्र श्री शाहीद तांबोळी , ऋषिकेश जोशी , महेश धोत्रे , तसेच पोलीस अधिकारी श्री, भगवान पाटील, श्री.राजेंद्र सावंत ,श्री शरद कांबळे, श्री.रामदास कांबळे ,दिवे ,गावचे सरपंच, श्री फैय्याज मुकादम गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री बरकत मुकादम पोलीस पाटील अशोक केळकर , तसेच गावातील ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले वनाधिकारी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले सदरचा बिबट्या हा सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणी सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वनाधिकारी रत्नागिरी गिरीजा देसाई यांनी केले आहे

Breaking News

मेळघाटच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊमंत्री उदय सामंत, प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दूरध्वनीवरून संवाद-- अमरावती, मेळघाट संघर्ष यात्रेच्या...

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरास्त्री...