दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) येथे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत “छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र” या ऐतिहासिक उपक्रमाचा कोनशिला अनावरण सोहळा पार पडला.
मला विशेष आनंद आहे की, दोन महिन्यांपूर्वी JNU मध्ये भेट दिल्यानंतर मी जे स्वप्न मांडलं होतं – छत्रपती शिवाजी महाराजांवरील अभ्यासक्रम व कुसुमाग्रजांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरु करण्याबाबत आज त्याचं मूर्तरूप पाहायला मिळालं. या साऱ्या प्रक्रियेत JNUच्या कुलगुरू शांतीश्री पंडित यांनी घेतलेली आस्थेची भूमिका उल्लेखनीय आहे. त्यांना मनापासून धन्यवाद, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
छत्रपती शिवरायांचा जागतिक वारसा, त्यांचं अद्वितीय नेतृत्व, रणनीती आणि राष्ट्रहितासाठीचा लढा – हा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी आहे.
महायुती सरकारच्या वतीने मी सांगतो, की लवकरच JNUच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार असल्याचा शब्द या कार्यक्रमानिमित्त मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिला.
मराठी भाषेला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे अनेक निर्णय राज्य शासनाने घेतले आहेत:
काश्मीर मध्ये मराठी पुस्तकांचं गाव तयार होत आहे, परदेशात 17 मराठी शाळा वाढवून 74 शाळा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या “विश्व मराठी संमेलनाचं”आयोजन देखील करण्यात येणार आहे. मराठी भाषेवर केवळ राजकारण न करता, ती गौरवशाली परंपरा आणि जागतिक अस्तित्व देण्याचं काम महायुती सरकारने केलं आहे.
आज मराठी भाषेचं जे अध्यासन केंद्र JNUमध्ये सुरू होतंय, त्यामध्ये महाराष्ट्रातून जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी व्हावेत, ही माझी मनापासून इच्छा आहे. प्रत्येक जिल्ह्यातून हे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी पुढे यावेत, यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असल्याचं मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितलं.