रत्नागिरीदिव्यांग सेवा संस्था, चिपळूण आयोजित दिव्यांग सहल ऊत्साहात संपन्न

दिव्यांग सेवा संस्था, चिपळूण आयोजित दिव्यांग सहल ऊत्साहात संपन्न

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही दिव्यांगांची वार्षिक सहल, शेगाव येथे आयोजित करण्यात आली होती. १४२ दिव्यांगांनी या सहलीत सहभाग नोंदविला.या सहलीचे वैशिष्ट्य असे की, तीव्र दिव्यांगत्त्वामुळे, घराचा उंबरठा न ओलांडलेले दिव्यांग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. २० व्हीलचेअर सहली सोबत होत्या. विविध प्रकारचे दिव्यांग, एकमेकांना पुरक सहाय्य करीत, तीव्र दिव्यांगांची सहल, सुलभ करीत होते. दिव्यांग शेगाव रेल्वे स्थानकावर उतरल्यापासून, देवदर्शन, आनंद सागर दर्शन उरकून पुन्हा परतीच्या प्रवासास सुरुवात होईपर्यंत, श्री गजानन महाराज सेवा संस्थानने अतिशय सुंदर असा पाहुणचार केला.

तसेच, दिव्यांगांच्या प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष, जयश्री गिते यांनी, श्री गजानन महाराज सेवा संस्थान आणि रत्नागिरी जिल्ह्यातून आलेले दिव्यांग यांच्यात समन्वय साधत दर्जेदार सेवा दिली. दिव्यांगांना स्वतःच्या हक्कांसाठी, संघर्ष करण्यासाठी सज्ज रहा. असे आवाहन केले.
दिव्यांग सेवा संस्थेसोबत, आजोळ वृध्दाश्रम ढोक्रवली, आरएचपी फौंडेशन रत्नागिरी, दिव्यांग जनकल्याण संस्था लांजा, दिव्यांग संस्था पाजपंढरी यांनी, सहकार्यासोबत, सहभाग नोंदविला.
आरएचपी फौंडेशन चे अध्यक्ष सादीकभाई नाकाडे हे, स्वतः तीव्र दिव्यांग असूनही, त्यांनी, सहलीत सहभागी तीव्र अस्थिव्यंग दिव्यांगांना, व्हील चेअर चा दिव्यांगांच्या जीवनातील व्यावहारिक उपयोग तसेच तो उपयोग कसा करावयाचा याचे प्रात्यक्षिक दाखवले. दिव्यांग सहलीसाठी, चिपळूण नगर परिषदेने व्हील चेअर्स उपलब्ध केल्या.
रत्नागिरीचे समिर नाकाडे यांच्या नेतृत्वाखाली, लौकिक सावंत, हमिद भुस्कुटे, राजेंद्र कदम, संदिप धुमाळी, धनंजय धुमाळी, ऐय्याज शेख, निलेश पाटेकर, दिनकर मांडवकर, विलास भारती यांनी, तीव्र अस्थिव्यंग दिव्यांगांना हाताळण्याचे काम, थोडक्यात व्हील चेअर मधून, ट्रेनमधे चढवणे-ऊतरवणे, देवदर्शन घडवणे, अतिशय तर्कशुद्ध पध्दतीने, लीलया साधले.
सहली दरम्यान व शेगाव मुक्कामी, दिपक बाईंग, शांताराम लाड, किरण धनावडे, प्रदीप लिंगायत, मयुर जाधव, गणेश चव्हाण, विजया मेस्त्री, संपदा गावडे यांनी भजन-कीर्तनात सहभागी होऊन सहलीत रंगत आणली.
अश्विनी भुस्कुटे यांच्या माध्यमातून या सहलीचे नियोजन करण्यात आले होते. दिव्यांग संगिता काजारे यांनी, देवदर्शन सहलीत सहभागी होणार्‍या दिव्यांगांची, दिव्यांगांच्या जोडीदारांची नोंदणी, रेल्वे आरक्षण, आरक्षणानूसार दिव्यांगत्त्वानूसार, बर्थ उपलब्ध करुन देणे. असे सहल यशस्वीतेसाठी सर्वात महत्त्वाचे कार्य सहजतेने, यशस्वीरित्या संभाळले.
दिव्यांग सहल यशस्वी होण्यासाठी, दिव्यांग सेवा संस्थेच्या अध्यक्ष भारती निलेश पाटेकर, सचिव अशोक विठ्ठल भुस्कुटे, गौरी कांबळे, आजोळ वृध्दाश्रमाचे मानसी व माधव सावंत, यांनी विशेष परिश्रम घेतले.

Breaking News

दैवज्ञ हितवर्धक समाज , आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याला दुहेरी मुकुट

दैवज्ञ हितवर्धक समाज,रत्नागिरी आयोजित रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने...