रत्नागिरीदेवाचे गोठणे ता.राजापूर राघववाडी विविध समस्या संदर्भात आमदार किरण सामंत यांची ग्रामस्थांसमवेत...

देवाचे गोठणे ता.राजापूर राघववाडी विविध समस्या संदर्भात आमदार किरण सामंत यांची ग्रामस्थांसमवेत बैठक संपन्न

देवाचे गोठणे ता.राजापूर राघववाडी विविध समस्या संदर्भात आमदार किरण सामंत यांची ग्रामस्थांसमवेत बैठक संपन्न
👉देवाचे गोठणे ता. राजापूर येथील राघववाडी परिसरातील विविध प्रलंबित समस्या आणि विकासकामांच्या संदर्भात आमदार किरण सामंत यांनी ग्रामस्थांसमवेत बैठक घेत नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. गावातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, गटारे तसेच इतर विकासकामांबाबत ग्रामस्थांनी आपल्या समस्या आमदारांसमोर मांडल्या.*

यावेळी ग्रामस्थांनी परिसरातील अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. विशेषतः पिण्याच्या पाण्याची समस्या, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था तसेच काही ठिकाणी अपुरी सुविधा असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

बैठकीत बोलताना आमदार किरण सामंत यांनी ग्रामस्थांना आश्वस्त करत सांगितले की, “जनतेच्या समस्या सोडविणे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. गावाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत टप्प्याटप्प्याने सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल.”

तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन प्रलंबित कामे गतीने पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि ग्रामस्थांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

बैठकीला स्थानिक ग्रामस्थ, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संबंधित विभागाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी आपल्या समस्या प्रत्यक्ष आमदारांसमोर मांडल्याने समाधान व्यक्त केले. तालुका प्रमुख दीपक नागले, सभापती नंदनी कदम, राजू करूप, मुन्ना खामकर, जिल्हा परिषद कोमल नवाळे, स्पृहा गुरव,संजय नाटेकर, विनोद शेलार, सुनील गुरव, प्रसाद गुरव, गौरव सौरप यांचे सहित ग्रामस्थ उपस्थित होते.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...