रत्नागिरीदैवज्ञ हितवर्धक समाज , आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण...

दैवज्ञ हितवर्धक समाज , आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याला दुहेरी मुकुट

दैवज्ञ हितवर्धक समाज,रत्नागिरी आयोजित रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ४ थी दैवज्ञ चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा दैवज्ञ हॉल, नाचणे, रत्नागिरी येथे दिनांक १० व ११ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली होती. सदर कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याने पुरुष एकेरी गटाचे व दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवले. या स्पर्धेचे रत्नागिरी जिल्हातून सर्व गटातून सुमारे १५० स्पर्धकांनी भाग घेतला होता.स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अभिषेक चव्हाण याने राहुल भस्मे विरुध्य खेळताना २५ – २० व २५ – ००असा जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या दुहेरीच्या अंतिम सामन्यात रियाज अकबरअली व अभिषेक चव्हाण या जोडीने दिनेश पारकर व ओमकार मोरे या जोडीचा २०-०८, १७-११ असा सरळ दोन गेम मध्ये विजय मिळवला. महिला गटाचे विजेतेपद स्वरा मोहिरे हिने स्वरा कदम हिचा, कुमार गटाचे विजेतेपद रत्नागिरीच्या ओम पारकर याने जैतापुरचा आर्यन राऊत याचा, किशोर गटाचे विजेतेपद गुहागरच्या स्मित कदम याने रत्नागिरीच्या नील जाधव याचा व किशोरी गटाचे विजेतेपद राजापूरच्या निधी सप्रे हिने रत्नागिरीच्या श्रावस्ती कांबळे हिचा पराभव करून मिळवले.
स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री संतोष भुर्के अध्यक्ष दैवज्ञ हितवर्धक समाज, श्री धनेश रायकर सरचिटणीस दैवज्ञ हितवर्धक समाज, श्री प्रदीप भाटकर अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन, श्री मिलिंद साप्ते सचिव रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन, श्री विनय गांगण सदस्य रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन, प्रमुख पंच सागर कुलकर्णी, मंदार दळवी आणि दैवज्ञ हितवर्धक समाजाचे कार्यकर्ते, जिल्हातील कॅरम खेळाडू व कॅरम प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनाच्या कारेक्रमात शाळेतील गरजू मुलांना व कुमार गटातील खेळाडूना दैवज्ञ हितवर्धक समाजा तर्फे वह्यांचे वाटप करण्यात आले. स्पर्धेच्या कालावधीत दैवज्ञ हितवर्धक समाजा तर्फे सर्व खेळाडू प्रेषक यांच्या नाश्टा जेवण याची वेवस्था करण्यात आली होती.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री संतोष भुर्के अध्यक्ष दैवज्ञ हितवर्धक समाज, श्री धनेश रायकर सरचिटणीस दैवज्ञ हितवर्धक समाज, श्री प्रदीप भाटकर अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन, श्री मिलिंद साप्ते सचिव रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन, श्री विनय गांगण सदस्य रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन, प्रमुख पंच सागर कुलकर्णी, मंदार दळवी आणि दैवज्ञ हितवर्धक समाजाचे कार्यकर्ते, जिल्हातील कॅरम खेळाडू व कॅरम प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे.
 पुरुष एकेरी
अंतिम सामना – अभिषेक चव्हाण विजयी विरूध्द राहुल भस्मे ( २५-२०,२५-००)
उपान्त फेरी १ – अभिषेक चव्हाण विजयी विरूध्द योगेश कोंडविलकर ( २५-१२,२५-००)
उपांत्य फेरी २ – राहुल भस्मे विजयी विरूध्द रियाज अकबरअली ( २५-१५,१५-१७,१५-११)
 पुरुष दुहेरी
दुहेरी अंतिम सामना – रियाज अकबरअली / अभिषेक चव्हाण विजयी विरूध्द
दिनेश पारकर / ओमकार मोरे ( १५-०१, १०-०३ )
उपांत्य फेरी १ – रियाज अकबरअली / अभिषेक चव्हाण विजयी विरूध्द
राहुल भस्मे / योगेश कोंडविलकर ( २०-०८,१७ -११)
उपांत्य फेरी २ – दिनेश पारकर / ओमकार मोरे विजयी विरूध्द
मनोज सप्रे / महेश शेट्ये ( ००-२५,२५-००,२५-००)
 महिला गट एकेरी
अंतिम सामना – स्वरा मोहिरे विजयी विरूध्द स्वरा कदम ( २५-०८,२५-११)
उपांत्य फेरी १ – स्वरा मोहिरे विजयी विरूध्द सृष्टी चवंडे ( १५-०९,२५-०९)
उपांत्य फेरी २ – स्वरा कदम विजयी विरूध्द निधी सप्रे ( ०९-२०,२०-१३,२५-००)
 कुमार गट एकेरी
 अंतिम सामना – ओम पारकर विजयी विरूध्द आर्यन राऊत ( १४-०२,२४-००)
उपांत्य फेरी १ – ओम पारकर विजयी विरूध्द सर्वेश अमरे ( १४-००,२०-००)
उपांत्य फेरी २ – आर्यन राऊत विजयी विरूध्द हर्षल पाटील ( १२-०४, १७-००)
 किशोर गट एकेरी
अंतिम सामना – स्मित कदम विजयी विरूध्द नील जाधव ( १०-१५,१५-०७,०६-०५)
उपांत्य फेरी १ – नील जाधव विजयी विरूध्द विराज वायंगणकर ( २४-००,१२-००)
उपांत्य फेरी २ – स्मित कदम विजयी विरूध्द आदित्य देसाई (२२-००,२३-००)
 किशोरी गट एकेरी
अंतिम सामना – निधी सप्रे विजयी विरूध्द श्रावस्ती कांबळे ( २१-००,१३-००)
उपांत्य फेरी १ – निधी सप्रे विजयी विरूध्द अनन्या चवंडे ( १८-००,१६-००)
उपांत्य फेरी २ – श्रावस्ती कांबळे विजयी विरूध्द शुभ्रा कदम ( १०-०१,०६-०७,०८-०६)
स्पर्धा अतिशय चांगल्या वातावरणात पार पडली. स्पर्धेत ३ ब्रेक टू फिनिशची नोंद झाली. त्यापैकी अभिषेक चव्हाण याने दोन व ओम पारकर याने एका ब्रेक टू फिनिशची नोंद केली. स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी दैवज्ञ हितवर्धक समाजाच्या वतीने व सचिन बंदरकर यांनी खुप मेहनत घेतली.

Breaking News