Uncategorizedनम्र आवाहन : पर्यटनाचा आनंद घ्या, पण सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

नम्र आवाहन : पर्यटनाचा आनंद घ्या, पण सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

नम्र आवाहन : पर्यटनाचा आनंद घ्या, पण सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या!

पर्यटक बंधू-भगिनींनो,

अत्यंत दुःखद घटनांची नोंद घेणे आवश्यक आहे. गेल्या काही महिन्यांत कोकणात दोन भीषण दुर्घटना घडल्या आहेत :
१. आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ वाहन १२०० फूट खोल दरीत कोसळल्यामुळे १८ ते २५ वयोगटातील ८ युवकांचा मृत्यू झाला.
२. जून महिन्यात गणपतीपुळे येथे समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ५ पर्यटकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडलेले हे तरुण आपल्या कुटुंबियांकडे परतू शकले नाहीत. या सर्व दुर्घटनेतील मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻💐

आजच्या धावपळीच्या व तणावपूर्ण जीवनशैलीत वीकेंडला विरंगुळ्यासाठी बाहेर पडणे स्वाभाविक आहे. परंतु, मौज-मजेच्या भरात आपल्या अमूल्य जीवाची सुरक्षितता विसरून चालणार नाही.

पावसाळी व समुद्रकिनारी पर्यटन करताना खालील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, ही विनंती :

१. वाहनाचा वेग व वाहतूक शिस्त : घाटरस्त्यावरील अवघड वळणांवर व निसरड्या रस्त्यांवर वाहनाचा वेग मर्यादित ठेवा. दरीच्या कडेला होणाऱ्या एका लहानशा चुकीलाही माफी नसते. ‘उशिरा पोहोचलेले बरे, पण सुरक्षित पोहोचणे अधिक महत्त्वाचे.’
२. रील व सेल्फीचा अतिरेक टाळा : केवळ सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी धोकादायक कड्यांवर, समुद्राच्या लाटांमध्ये किंवा पुलाच्या कठड्यावर उभे राहून स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. ‘एक रील संपूर्ण आयुष्यावर भारी पडू शकते.’
३. जलस्रोतांजवळ विशेष सावधगिरी बाळगा :
– समुद्रात खोलवर जाऊ नये. लाटांचा व प्रवाहाचा अंदाज लावणे कठीण असते.
– ‘मला पोहता येते’ या आत्मविश्वासावर समुद्रात उतरू नये. समुद्राचे पाणी व प्रवाह वेगळे असतात.
– मद्यपान करून पाण्यात उतरू नये.
– प्रशासनाने ‘पोहण्यास मनाई’ फलक लावलेल्या किंवा लाल बावटा उभारलेल्या ठिकाणी जाऊ नये.
– धबधब्याखालील दगडांवर उभे राहणे व सेल्फी घेणे टाळावे. दगड निसरडे असतात व पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो.
४. रात्रीचा प्रवास टाळा : शक्यतो घाटरस्त्याने व निर्जन समुद्रकिनाऱ्यावर रात्रीचा प्रवास करू नये. धुके, पाऊस व कमी दृश्यमानतेमुळे अपघाताचा धोका वाढतो.
५. स्थानिक सूचना व प्रशासनाचे नियम पाळा : जीवरक्षक, पोलीस व स्थानिक नागरिकांनी दिलेल्या सूचना पाळाव्यात. धोक्याच्या जागांची माहिती त्यांनाच अचूक असते.

लक्षात ठेवा – सहल दोन दिवसांची असते, पण गेलेले आयुष्य परत मिळत नाही. तुमचे आई-वडील व कुटुंबीय तुमची घरी वाट पाहत असतात.

“सेल्फी काढा, पण स्वतःला सेफ ठेवा!”

“लाईक महत्वाचे नाहीत, तुमचे लाइफ महत्वाचे आहे!”

सुरक्षित पर्यटन करा, आनंदी रहा व सुखरूप घरी परता.

श्री अजित अनुराधा आबाजीराव कदम,
श्री सुधाकर राधिका कृष्णाजीराव कदम,
मु. पो. टेरव, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी,
विशेष कार्यकारी अधिकारी,
सरस्वती कोचिंग क्लासेस, मुंबई.
9819331960

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...