संगमेश्वर/एजाज पटेल मुसळधार पावसात स्पर्धाकांच्या उत्साहामुळे अकरावी भक्त स्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर क्रॉसकंट्री स्पर्धा जल्लोषमय वातावरणात पार पडली.डेरवण येथील एसव्हिजेसिटी क्रीडा संकुलनाने श्री विठ्ठलराव जोशी ट्रस्ट तर्फे आयोजित केलेल्या या क्रॉसकंट्री स्पर्धेत फुणगूस येथील नवजीवन विद्यालय शाळेची विध्यार्थिनी गौरी शीतप हिने 14 ते 16 वर्ष वय मुली या गटात 3की. मी (3000मीटर)धावणे या खेळ प्रकारात उत्तुंग अशी भरारी मारत ब्राँझ पदकाला गवसणी घातली. चिपळूण तालूक्यातील डेरवण येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत फुणगूस येथील नवजीवन विद्यालयातील विध्यार्थ्यांनी विविध वयोगटातील स्पर्धेत भाग घेतला होता.14 ते 16 वर्ष वय मुलींच्या गटातून भाग घेतलेल्या गौरी शीतप या विध्यार्थिनीने 3000 मीटर चा टप्पा पार करत ब्राँझ पदकाला गवसणी घालून शाळेचे नाव रोशन केले.क्रॉसकंट्री आयोजकांकडून सन्मानमूर्ती ठरलेल्या गौरी शीतप हिला प्रशस्तिपत्र,ब्राँझ पदक व रोख रक्कम एक हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. तर 12 ते 14 वर्ष वय मुली 2 किमी धावणे.कुमारी: सोनल शितप,12 ते 14 वर्ष वय मुले 3किमी धावणे कुमार:ओम थुळ व दुर्वेश मेस्त्री,14 ते 16 वर्ष वय मुले 4 किमी धावणे कुमार:आदर्श भुवड व स्वरूप थुळ यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धा पूर्ण केली आहे. अकराव्या भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर क्रॉसकंट्री स्पर्धेचे उदघाट्न आंतरराष्ट्रीय धावपटू शिवानी गायकवाड हिच्या शुभहस्ते करण्यात आले होते.यावेळी शरयू यशवंतराव,डॉ. नेताजी पाटील,डॉ. चंद्रशेखर एल,अजित गालवणकर,संदीप तावडे,क्रीडा मार्गदर्शक सचिन मांडवकर,शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त जगदीश नानजकर,क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर आदी उपस्थित होते. शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील इतिहासात सुवर्ण अक्षरात नाव नोंदण्यात यावे अशी दैदीप्यमान कामगिरी करणारी कुमारी:गौरी शितप ही पहिलीच विद्यार्थिनी आहे. या यशामुळे शाळेच्या विद्यार्थ्यामध्ये आनंदाचे वातावरण असून, क्रीडा क्षेत्रातील या दैदीप्यमान कामगिरी बद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सुनिल पाटील, संस्था अध्यक्ष श्री. चंदुभाई देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. अरुण डिंगणकर, सचिव श्री.दिलीप कुळकर्णी, व सर्वं शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गौरी व सर्व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच फुणगूस खाडीभाग जनतेकडूनही गौरी व सहभागी खेळाडूंचे प्रत्यक्ष भेटून तसेच व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया वरून संदेशद्वारे अभिनंदनाचा वर्षाव करत पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव केला जात असतानाच चमकदार कामगिरी करून स्वतःच्या नावा बरोबर शाळेचे नाव लौकिक करणाऱ्या गौरीचे मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करतानाचे फोटो आणि व्हिडिओ अनेकजन मोबाईल स्टेट्सवर ठेऊन गौरीचे कौतुक करत आहेत.
नवजीवन विद्यालयाच्या गौरी शितप ने डेरवण येथील क्रॉसकंट्री 3की.मी स्पर्धेत ब्रांझ पदकाला घातली गवसणी.
