रत्नागिरीनसरापूर बालिका अत्याचारी आणि हत्यारा भीमराव कांबळे ला फाशी द्या… दापोलीकरांची मागणी

नसरापूर बालिका अत्याचारी आणि हत्यारा भीमराव कांबळे ला फाशी द्या… दापोलीकरांची मागणी

नसरापूर बालिका अत्याचारी आणि हत्यारा भीमराव कांबळे ला फाशी द्या… दापोलीकरांची मागणी-

👉दापोली तालुक्यातील निवेदिता प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यातील भोर मधील नरसापूर परिसरात बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी अटक असलेल्या नराधमाला फाशी द्या अशी प्रमुख लेखी मागणी गृहमंत्री तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे करण्यात आली आहे*. .
*सोमवार दिनांक ४ मे रोजी सदर बाबतचे निवेदन दापोली तहसीलदार यांचेकडे दापोलीकरांनी बहुसख्येने उपस्थित राहून सादर करण्यात आले आहे. या निवेदनानुसार पुणे जिल्ह्यातील भोर मधील नसरापूर परिसरात बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.आणि त्याला फाशीची शिक्षा होणे बाबत मागणी करण्यात आली आहे.
तसेच , पोक्सो आणि महिला अत्याचार विरोधी कायद्यामध्ये सुधारणा करून कडक नियमांची अंमलबजावणी आणि अत्यंत तातडीचा निर्णय करण्याची प्रक्रिया करण्याबाबत कायद्यामध्ये सुयोग्य बदल घडवून आणावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे
महाराष्ट्र राज्यातील आणि देशातील बालिका, कुमारीका, युवती , महिला,ज्येष्ठ महिला या सर्वांनाच संरक्षण मिळावं. मानसिक बदल घडवण्यासाठी विशेष कृतिदल स्थापन करावे.
प्रत्येक पोलीस स्थानकात असलेल्या महिला सुरक्षा समिती अधिक गतीमान करून त्या समितीला अधिकारही देण्यात यावेत. प्रत्येक पोलीस ठाणे प्रमाणेच प्रत्येक गाव पातळीवर पोलीस पाटील अंतर्गत महिला सुरक्षा समिती स्थापन करून कार्यशाळा घेऊन एक कृती दल स्थापन करावे.
पोक्सो आणि विनयभंग प्रकरणी ज्या आरोपींवर गुन्हा दाखल आहे व शिक्षा भोगत आहेत किंवा भोगली आहे अशा आरोपींना दरमहा स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडे हजेरी लावणे अनिवार्य करण्यात यावे. तसेच सरकारच्या सर्व सवलती मधून त्यांना वगळण्यात यावे.
महिला सुरक्षांसाठी जे मोबाईल क्रमांक दिले आहेत त्याचा प्रचार प्रसार अधिक मोठ्या प्रमाणावर करून एक सुरक्षा कवच निर्माण करणे आवश्यक आहे.
अशा मागण्यांसमवेत नरसापूर येथील चिमुरडीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीला कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी कठोर मागणी या निवेदनाद्वारे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे करण्यात आली आहे.
या प्रसंगी निवेदिता प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. प्रशांत परांजपे, मनसेचे सचिन गायकवाड, बेलोस महाविद्यालयाच्या संचालिका जानकी बेलोसे, पतंजली योग च्या योगशिक्षिका हर्षदा डोंगरे, योगशिक्षक शैलेश आठल्ये, प्राजक्ता कार्ले, ऋतुजा गोडबोले यांनी आपल्या मनोगतातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आणि नराधम आरोपीच्या फाशीची मागणी केली. निवेदन सादर करण्यासाठी निवेदिता प्रतिष्ठानचे महेश्वरी विचारे, शीतल देवरुखकर, मिलिंद शेठ, अविनाश खुळे, सुनील चव्हाण, अस्मिता परांजपे, सायली साळुंखे यांच्यासह दापोलीतील महिला, व्यापारी, युवक,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...