रत्नागिरीपवार कुटुंबीयांचे मंत्री नितेश राणे यांनी केले सांत्वन

पवार कुटुंबीयांचे मंत्री नितेश राणे यांनी केले सांत्वन

बारामती: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार व मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी बारामती येथे जाऊन पवार कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी दिवंगत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
नितेश राणे यांनी बारामती येथील निवासस्थानी जाऊन पार्थ पवार यांची भेट घेतली. अजितदादांच्या निधनामुळे पवार कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात सहभागी होत त्यांनी धीर दिला. “पवार कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांना मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” अशा शब्दांत नितेश राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Breaking News

२२ वी राज्य बालनाट्य स्पर्धा: रत्नागिरीच्या ‘धोंड’ नाटकाचा कोल्हापूर केंद्रावर गौरव!

विदुला मुळ्येला 'रौप्यपदक' तर हर्ष नागवेकरला 'संगीत' पारितोषिक; पटवर्धन...

केंद्रीय अर्थसंकल्पात वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गसाठी ३२४४ कोटींची तरतूद

*पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती*मच्छिमार, नारळ, काजू...