रत्नागिरीपावस उपडाकघराचा विक्रम; दोन दिवसांत १,१८७ नवीन खाती उघडली

पावस उपडाकघराचा विक्रम; दोन दिवसांत १,१८७ नवीन खाती उघडली

पावस उपडाकघराचा विक्रम; दोन दिवसांत १,१८७ नवीन खाती उघडली
रत्नागिरी : पोस्ट विभागाच्या विविध बचत योजनांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा आणि विक्रमी संख्येने खाती उघडण्याचा उपक्रम राबवावा, या उद्देशाने रत्नागिरी पोस्टल विभागातर्फे ‘स्पेशल ड्राइव्ह’ आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत पावस उपडाकघराने अवघ्या दोन दिवसांत तब्बल १,१८७ नवीन खाती उघडून विक्रम नोंदवला.
रत्नागिरी पोस्टल विभागाचे डाकघर अधीक्षक श्री. कुलकर्णी आणि सहाय्यक डाकघर अधीक्षक श्री. सरंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. पावस उपडाकघराच्या उपडाकपाल श्रीमती साळवी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली पावस उपडाकघराशी संबंधित नऊ ब्रँच पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी या विशेष मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
३० जुलै २०२६ आणि ३१ जुलै २०२६ या दोन दिवसांत पोस्टाच्या विविध बचत योजनांमध्ये तब्बल १,१८७ नवीन खाती उघडण्यात आली. एका दिवसात १,००१ खाती उघडण्याचे उद्दिष्ट ठेवून या विशेष ड्राइव्हची संकल्पना करण्यात आली होती. मात्र, कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दोन दिवसांत उद्दिष्टापेक्षाही अधिक खाती उघडण्यात आली.
पोस्ट खाते हे सर्वसामान्यांच्या विश्वासाचे खाते म्हणून ओळखले जाते. आपल्या आयुष्यभराची पुंजी नागरिक मोठ्या विश्वासाने पोस्टाच्या विविध बचत योजनांमध्ये गुंतवतात. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन पोस्ट विभागाने विविध बचत योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. तेलंगणाच्या नेलामंगला उप डाकघर यांच्या उपक्रमावर महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात पावस उपडाकघराने १,१८७ नवीन खाती उघडून उल्लेखनीय कामगिरी केली. या विक्रमी कामगिरीसाठी पावस उपडाकघरातील उपडाकपाल श्रीमती साळवी मॅडम तसेच नऊही ब्रँच पोस्ट ऑफिसमधील सर्व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
नागरिकांचा पोस्ट विभागावरील विश्वास, कर्मचाऱ्यांचे नियोजन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर पावस उपडाकघराने रत्नागिरी पोस्टल विभागाच्या विशेष ड्राइव्हमध्ये उल्लेखनीय विक्रम नोंदविला आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Breaking News

आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा.परिषद. आदर्श मराठी शाळा वहाळ येथे दिंडी उत्साहात

आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा.परिषद. आदर्श मराठी शाळा वहाळ येथे दिंडी...

रत्नागिरी येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण हायस्कूलमध्ये शिक्षक प्रशिक्षण उत्साहात संपन्न

रत्नागिरी येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण हायस्कूलमध्ये शिक्षक...