रत्नागिरीफासकीत अडकला बिबट्या

फासकीत अडकला बिबट्या

रविवार दिनांक 16/ 3 /2025 रोजी सकाळी ठीक 7.30 च्या दरम्याने मौजे फणसवळे ता. जिल्हा रत्नागिरी येथील श्री भगवान श्रीपत पाटील यांच्या आंबा कलम बागेत गुरखा फेरी मारत असताना बिबट्या जातीचा वन्यप्राणी फासकी तोडून फासकीसहित बागेत बसलेला दिसून आला याबाबत वनविभागाला कळविलेप्रमाणे वनपाल पाली, वनरक्षक जाकादेवी, यानी जागेवर जाऊन खात्री केली असता सदर बिबट्याच्या कमरेला फासकी लागलेली दिसून आली, सदरची फासकी तोडून आलेल्याचे निदर्शनास आले, सदरचा बिबट्या हा मोठमोठ्याने धापा टाकत असलेला दिसून आला, तसेच निपचित पडत असलेला दिसून आला, तात्काळ रेस्क्यू टीम व पिंजरा बोलवून पोलिसांच्या माध्यमातून ग्रामस्थांना बाजूला करण्याचे काम करून, पिंजरा व जाळीच्या साह्याने बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच बिबट्या जागेवरच बेशुद्ध आवस्थेत आढळून आला, त्यानंतर थोडय़ाच वेळात बिबटय़ा मृत झाला, सदर आंबा कलम बागेला सभोवर दगडी बांध असून त्यावर काटेरी कुंपण आहे सदर बिबट्या मृत झाल्याने पशुवैद्यकीय अधिकारी रत्नागिरी झाडगाव यांचेकडून शव विच्छेदन करून घेतले, सदरचा बिबट्या हा नर जातीचा असून तो सुमारे सात वर्षे वयाचा आहे, मृत शरीर सर्व अवयवासहित जाळून नष्ट करण्यात आलेले आहे सदर कामी वनविभागाने गुन्हा नोंद केलेला असून सदरची फासकी कोठे व कोणी लावली याबाबत वन अधिकारी शोध घेत असून पुढील तपास चालू आहे सदरची कार्यवाही ही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळून श्रीमती गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली सदर कामी ग्रामीण पोलीस ठाणे रत्नागिरी एएसआय श्री सावंत श्री भाटले पोलीस हवालदार पालवे होमगार्ड श्री पालते व श्री नाखरेकर यांचे तसेच स्थानिक ग्रामस्थ पोलीस पाटील सुजाता आंबेकर यांचे सहकार्य लाभले सदरचे काम परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार, वनपाल पाली न्हानू गावडे, वनरक्षक जाकादेवी शर्वरी कदम, वनरक्षक रत्नागिरी प्रभू साबणे, रेस्क्यू टीम अनिकेत मोरे, महेश धोत्रे हे उपस्थित होते अशा प्रकारच्या घटना घडल्यास वनविभागाला तात्काळ कळविणे बाबत गिरिजा देसाई विभागीय वनअधिकारी रत्नागिरी यांनी वन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या नंबर वर कळविणे बाबतचे आवाहन करण्यात आलेले आहे
.

Breaking News

अली पब्लिक स्कूल सावर्डेचे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अशी प्रदर्शने उपयुक्त – अशोक शितोळेसावर्डे...